आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने साधला ऋषी कपूरवर निशाना, म्हणाला - मला काही लोक पसंत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. त्याच्यानुसार इंडस्ट्रीमध्ये त्याचा कुणीही शत्रू नाही. परंतू काही लोक मला पसंत करत नाही आणि यामुळे मला काहीच फरक पडत नाही. सलमानने एका इंग्रजी एन्टटेन्मेंड वेबसाइटसोबत बातचित करताना हे सांगितले. असे मानले जात आहे की, सलमानने शत्रूचे निमित्त साधून ऋषी कपूरवर निशाना साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर आणि सलमानचा वाद मीडियामध्ये चर्चेत होता.


सलमान म्हणाला - एक दोन कुटूंब आहेत, ते खान कुटूंबीयांना मान देत नाहीत
- मुलाखतीत सलमानने सांगितले की, जे लोक माझ्या कुटूंबाचा मान ठेवत नाही. असे लोक मला आवडत नाहीत. सलमान मुलाखतीत म्हणाला की, असे एक-दोन कुटूंब आहेत. जे खान कुटूबाला मान देत नाहीत. सलमान म्हणतो की, अशा लोकांना माझ्या घरात कधीच एंट्री मिळणार नाही.


सलमान आणि ऋषी कपूर वाद नेमका काय?
- 8 मे रोजी सोनमचे रिसेप्शन होते. यावेळी सलमानचा लहान भाऊ सोहेल खानची पत्नी सीमासोबत ऋषी कपूरचा वाद झाला होता. ऋषी कपूर वारंवार सीमाकडे सलमानच्या वागण्याविषयी तक्रार करत होते. यानंतर या बोलण्याचे रुपांतर वादात झाले. यानंतर सीमाने सलमानला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा सलमान अपसेट झाला. यानंतर नीतू कपूरने नव-याच्या वतीने सोहेलची माफी मागितली. असे बोलले जाते की, रिसेप्शन पार्टी वेळी सलमान सर्वांना भेटला, त्यांच्यासोबत गाणे गायला पण ऋषी कपूरला नीट भेटला नाही. यामुळे त्यांना वाईट वाटले होते.

बातम्या आणखी आहेत...