आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलमान खानच्या काही फिल्म भलेही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप राहिल्या असतील, कमाई फार काही चांगली नसेल. मात्र सलमानचा एक रेकॉर्ड खचितच एखादा स्टार मोडू शकेल.
सलमान खानची नुकतीच रिलीज झालेली फिल्म 'टायगर जिंदा है'ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. 27 डिसेंबरला सलमान त्याचा 52वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या सलमानचे असे रेकॉर्ड जे मोडणे अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, आमिर खान किंवा अक्षय कुमार, रजनीकांतलाही शक्य नाही.
सलमानचे रेकॉर्ड मोडणे अवघड..
- सलमान खान एकमात्र असा बॉलिवूड स्टार आहे ज्याने सलग एक डझन फिल्म अशा दिल्या आहेत ज्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे.
- वर्ष 2010मध्ये प्रदर्शित 'दबंग' पासून हा सिलसिला सुरु झाला आहे. त्यानंतर सलमानने रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर, दबंग-2, जय हो, किक, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो, सुलतान, ट्यूबलाइट, सारख्या फिल्म दिल्या आहेत. या सर्व फिल्मने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.
सलग 12 फिल्मने पार केला 100 कोटींचा आकडा
- सलमान खानची नुकतीच टायगर जिंदा है ही फिल्म रिलीज झाली. या फिल्मनेही कमाईत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सलग 100 कोटी कमाई करणारी ही त्याची 12वी फिल्म आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.