आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan\'s Arpita Farm House Illegally Constucted In Panvel Showcause Notice Issued

अवैध आहे सलमानचे पनवेल येथील अर्पिता फार्म हाउस, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली शोकॉज नोटिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: काही दिवसांपुर्वी अमेरिकेतून परत आलेल्या केतन कक्कडने सलमान खान आणि त्याच्या कुटूंबीयांविरोधात आरोप केले होते. केतन म्हणाले होते की, सलमानच्या पनवेल येथील फार्म हाउसच्या शेजारी त्यांची जमीन आहे, तिथे त्यांना घर बांधायचे आहे, परंतू खान कुटूंबीय त्यांना त्रास देत आहेत. आता सलमानच्या फार्महाउसविषयी नवीन वाद समोर आला आहे. एका वृत्तपत्रानुसार महाराष्ट्र वन विभागाने अर्पिता फार्म्सच्या एनवायर्मेंटर ऑडिटनंतर खान कुटूबीयांना शोकॉज नॉटिस पाठवली आहे. 2003 मध्ये पनवेल येथील वाजापुर येथील संपुर्ण क्षेत्राला इको-सेन्सेटिव्ह झोन घोषित करण्यात आले होते. यानंतर येथे कोणत्याच प्रकारचे बांधकाम करता येऊ शकत नाही.

 

कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप
अर्पिता फार्म्सवर सिमेंट-कांक्रीटची केल्याने फॉरेस्ट कायद्याचे उल्लंघन करण्याचा आरोप आहे. खान कुटूबीयांना वनविभागाचे अधिकारी एसएस कापसेने नोटिस दिली होती. परंतू 11 दिवसांच्या आतच वाजापुर येथून कापसेची ट्रान्सफर करण्यात आली.
- कापसेने 9 जून 2018 रोजी सलीम खानला लीगल नोटिस पाठवली होती. त्यानुसार बांधकामाविषयी 7 दिवसांच्या आत उत्तर द्यायचे होते. रिपोर्टनुसार खान कुटूंबीयांनी

संवेदनशील क्षेत्रात अजून 9 कंस्ट्रक्शन केले आहेत.
- नोटिसनुसार खान कुटूंबावर यापुर्वीही 21 नोव्हेंबर 2017 ला फॉरेस्ट कायद्याचे उल्लंघन करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 

सलमानवर दिशाभूल करण्याचा आरोप
सलमानने नियमितीकरणासाठी क्रेंद्र आणि राज्य सरकारची दिशाभूल करण्याचा आरोपही नोटिसमध्ये लावण्यात आला आहे. विभागाने खान कुटूंबीयांना चेतावणी देत लिहिले की, "नोटिस मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत तुम्हाला जे काही मांडायचे आहे ते नोटिस पाठवणा-याकडे नोंदवा. जर तुम्ही या काळात या प्रकरणी स्पष्टीकरण दिले नाही तर तुम्हाला याविषयीकाहीच बोलायचे नाही असे समजण्यात येईल. यानंतर तुमच्या कुटूंबावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पत्त्यावर नोटिस पाठवण्यात आली आहे.
- वन विभागाच्या काही अधिका-यांनुसार महाराष्ट्र सरकारच्या 3 एप्रिल 2017च्या आदेशानुसार निर्माण नियमित करण्यात आले होते.
- सलीम खान याविषयी काहीच बोलले नाही. त्यांनी सांगितले की, कुटूंब योग्य वेळ आल्यावर याचे उत्तर देईल.

 

जुलैमध्ये होणार काळवीट प्रकरणी पुढची सुनावणी
जोधपुर जिल्हा आणि एडिशनल सेशन कोर्टामध्ये कायदेशीर कारवाईचे नवीन प्रकरण सुरु झाले आहे. निर्णय स्थगित करण्यात आला आहे आणि पुढची सुनावणी 17 जुलैला होईल. सलमान सध्या जामिनावर आहे, त्याला काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...