आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman's Four Films In The Top 5 Bollywood List, Race 3 Got Third Highest Advance Booking

रेस 3 सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग करणारा तिसरा मोठा चित्रपट, टॉप 5 मध्ये सलमानचे 4 चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा ईदच्या दिवशी रिलीज होणारा चित्रपट कमाईच्या बाबतीत ब्लॉक बस्टर मानला जातो. शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 29 कोटी 17 लाखांची कमाई केली आहे. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटवरुन ही माहिती दिली. 'रेस 3' ने रिलीज पुर्वीच एक रेकॉर्ड केला. या चित्रपटाची 16 कोटी अडवांस बुकिंग झाली. असे करणा-या बॉलिवूड चित्रपटाच्या लिस्टमध्ये 'रेस 3' तिस-या नंबरवर आहे. यामध्ये हॉलिवूड चित्रपटांनाही अॅड केले तरी या लिस्टमध्य रेस 3 चा नंबर 5 वा असू शकतो.


4000 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज
- रेस 3 देशभरात 4000 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला. ट्रेड एनालिस्ट अक्षय राठी यांनीही चित्रपट पहिल्या दिवशी 30 कोटी बिझनेस करणार असा अंदाज वर्तवला होता.
- रिलीज डेट 15 जूनसाठी अनेक अडवांस बुकिंग करण्यात आल्या होत्या यामुळे चित्रपटाचा 16 कोटींचा बिझनेस पहिलेच कन्फर्म झाला होता.

 

बॉलिवूड चित्रपटांच्या लिस्टमध्ये सलमानचे 4 चित्रपट
- ईदच्या सुट्ट्या आणि सलमानच्या फॅन फॉलोइंटमुळे रिलीजपुर्वीच सलमानच्या चित्रपटांची अडवांस बुकिंग होते.
- या लिस्टमध्ये सलमानचे 4 चित्रपट आहे. पहिला नंबर टायगर जिंदा है 2018 या चित्रपटाचा आहे. दूस-या नंबरवर सलमान खानचाच 'सुल्तान' हा चित्रपट आहे.
- चौथ्या नंबरवर आमिर खानचा दंगल हा चित्रपट आहे. तर 5 व्या नंबरवर सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हा चित्रपट आहे.


एवेंजर्स आणि बाहुबलीचा समावेश नाही
- या लिस्टमध्ये फक्त बॉलिवूड चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. हॉलिवूड चित्रपट एवेंजर्स इनफिनिटी वॉर आणि साउथचा चित्रपट बाहुबली 2 विषयी बोलायचे झाले तर रेस 3 पाचव्या क्रमांकवर येऊ शकतो.


2009 पासून सुरु झाला सलमानचे ईद कनेक्शन

2009 वॉन्टेड हा ईदला आलेला पहिला चित्रपट. 52 कोटींचे बजेट आणि प्रभुदेवाच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली होती.
2010 'दबंग' रिलीज झाला. चित्रपटाचे बजेट 42 कोटी होते. तर चित्रपटाने जवळपास 219 कोटींचा बिझनेस केला होता.
2011 'बॉडीगार्ड' रिलीज झाला. सलमान बॉडीगार्डमध्ये लव्हली सिंहच्या कॅरेक्टरमध्ये होता. 60 कोटीच्या बजेटच्या या चित्रपटाने 230 कोटींची कमाई केली होती.
2012 'एक था टायगर' रिलीज झाला. कबीर खानच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 320 कोटींचा बिझनेस केला होता. तर बजेट 75 कोटी होते.
2013 या ईदला सलमानचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही.
2014 'किक' चित्रपाटतून कमबॅक केले. चित्रपटाने 400 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटाचे बजेट 100 कोटी होते.
2015 'बजरंगी भाईजान' रिलीज झाला. चित्रपटाचे बजेट 100 कोटी होते. चित्रपटाने एकुण 977 कोटीची कमाई केली. 
2016 अनुष्का शर्मासोबत 'सुल्तान' चित्रपट केला. फक्त 80 कोटी बजेटच्या या चित्रपटाने 600 कोटींची कमाई केली.
2017 सलमान 'ट्यूबलाइट' चित्रपट घेऊन आला. चित्रपटाने 200 कोटींचे कलेक्शन केले.

बातम्या आणखी आहेत...