आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sampat Nehta Reveals Lawrence Bishnois Murder Plan, Security Incresed For Salman Khan

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत केली वाढ, काळवीट प्रकरणाचे कनेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी बिश्नोई समाजाच्या गँगस्टरने जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे तेव्हाचे प्रकरण आहे जेव्हा सलमानवर काळवीट शिकार प्रकरणाची केस सुरु होती आणि तो जोधपूर कोर्टात सुनावणीसाठी गेला होता. त्यावेळी लाँरंसच्या धमकीवर कोणी इतके लक्ष दिले नव्हते पण 6 मे 2018ला हरियाणा पोलिसांनी लाँरेंसचा साथीदार संपतला पकडले त्यावेळी लाँरेंसच्या पूर्ण प्लानची पोलिसांना कल्पना मिळाली. या बातमीनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली.

 

शार्प शूटर संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्सने हैदराबाद येथून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर संपतने अनेक खुलासे केले ज्यात सलमानच्या हत्येच्या कटाची माहिती मिळाली. काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेंस सलमानवर नाराज होता त्यामुळे त्याने त्याला मारण्याचा कट केला.
  
संपत नेहराने चौकशीत सांगितले की तो सलमान खानला मारायला मुंबईला पोहोचला होता. तेथे जाऊन त्याने रेकी केली होती. पोलिसांना संपतकडून सलमानच्या गॅलॅक्सी घराचे काही फोटो सापडले होते. या सर्व प्रकरणाचा तपास डीप्टी इंसपेक्टर सतीश बालन करत आहेत. 

 

सतीश बालनने सांगितले की, मे च्या पहिल्या आठवड्यात संपत नेहरा मुंबईच्या सलमान खानच्या घराबाहेर गेला होता. सलमान जेव्हा घरातील बाल्कनीत येतो तेव्हा त्यावेळचे काही फोटोज् यामध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार सलमानवर गोळी झाडण्यासाठी त्याला लवकरच हत्यारे मिळणार होते.

 

गेल्या २० दिवसांपासून संपत नेहरा नोकरासीठी प्रयत्न करत असल्याचे म्हणत फ्लॅटवर थांबला होता. सलमानला मारुन विदेशात पळून जाण्याची त्याची योजना होती. लॉरेंस बिश्नोईने तुरुंगात असतानाच सलमान खानला जीवे मारणार अशी धमकी दिली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लॉरेन्स बिश्नोई तसेच संपत नेहराचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...