आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Biopic Teaser Release Update संजू, रणबीर कपूर संजू टीजर रिलीज

प्रतीक्षा संपली... हुबेहुब संजूबाबासारखा दिसला रणबीर, रिलीज झाला \'संजू\'चा Teaser

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. राजकुमार हिराणी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित संजू या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. राजकुमार हिराणी यांनी अभिनेता संजय दत्तचा आयुष्यावर हा चित्रपट बनवला असून अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. एक मिनिटं 23 सेकंदांच्या या टीजरमध्ये रणबीर आपली छाप सोडतोय. यामधील अनेक सीन्स संजय दत्तच्या खासगी आयुष्याविषयी उत्सुकता निर्माण करतात. टीजरमध्ये संजय दत्तच्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संजय आजवर आपल्याला खासगी आयुष्यात  ज्या-ज्या लूकमध्ये दिसला, ते सर्व लूक टीजरमध्ये बघायला मिळत आहेत. या लूकमध्ये रणबीर अगदी हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय.  अवघ्या तासाभरात हा टीजर सवा तीन लाखांहून अधिक वेळा बघितला गेला आहे. 

 

 

 

चित्रपटाच्या शीर्षकाविषयी बागळगण्यात आला होता सस्पेन्स...

- संजय दत्तच्या बायोपिकचे शीर्षक राजकुमार हिराणी यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. आजच या चित्रपटाच्या शीर्षकावरुन पडदा उचलण्यात आला. 
- सोमवारी रात्री सुभाष घई यांनी स्पेशल स्क्रीनिंगच्या माध्यमातून हा टीजर पाहिला आणि यानंतर त्यांनी ट्वीट केले. घईंनी  ट्वीटमध्ये लिहिले की, "मी संजय दत्तचे आयुष्य, डायरेक्टर राजकुमार हिराणी आणि अभिनेता रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटाच्या टीजरची प्रशंसा करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. हिरानीने काल मला व्हिसलिंग वुड(सुभास घईंचे अॅक्टिंग स्कूल) मध्ये चित्रपटाचे टीजर दाखवले."

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या चित्रपटाच्या टीजरविषयी काही गोष्टी...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...