आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Connection To Mumbai Serial Blast 1993 Mumbai Blast: 23 वर्षे सुरु होता संजूवर खटला,बाळासाहेबांच्या मदतीने मिळाला होता जामीन

Mumbai Blast: 23 वर्षे सुरु होता संजूवर खटला,बाळासाहेबांच्या मदतीने मिळाला होता जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै 2007 मध्ये टाडा कोर्टाने संजय दत्तला 6 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
2013मध्ये सुप्रीम कोर्टाने ती शिक्षा कमी करुन पाच वर्षे केली होती.

 

बॉलिवूड डेस्कः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या चित्रपटात  1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा उल्लेख आहे. या घटनेमुळे संजय दत्तला तुरुंगवास भोगावा लागला होता. तब्बल 23 वर्षे त्याच्यावर हा खटला चालला. याप्रकरणी संजयला पहिल्यांदा 19 एप्रिल 1993 रोजी एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. त्याला अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ही अटक झाली होती आणि 20 वर्षे हा खटला चलला. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला याप्रकरणी 5 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण तुरुंगातील त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच 25 फेब्रुवारी 2016 रोजी सोडण्यात आले होते.

 

काय होते हे संपूर्ण प्रकरण...
12 मार्च 1993 साली मुंबईत एकामागून एक 12 बॉम्ब ब्लास्ट झाले. या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला होता. पहिला ब्लास्ट 1 वाजून 29 मिनिटांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर झाला होता. त्यात 84 जण मृत्यूमुखी पडले होते.  
- या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर 23 जणांची न्यायालयाने मुक्तता केली होती. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

 

बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीने जामिनावर बाहेर आला होता संजय दत्त... 
मुंबईत 1992 ला दंगल उसळली होती. त्यानंतर लगेचच 12 मार्च 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटानंतर संजय दत्तच्या घरी अवैध शस्त्र सापडली होती. त्यामुळे 'टाडा' कायद्याखाली संजय दत्तला अटक होऊन, 1995 ला संजय दत्तची रवानगी जेलमध्ये झाली. पण संजय दत्तच्या सुटकेसाठी त्याचे वडील सुनील दत्त जंग-जंग पछाडत होते. सुनील दत्त यांनी संजूबाबाच्या सुटकेसाठी अखेर बाळासाहेब ठाकरेंना साद घातली. संजूबाबा तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सुनील दत्त हे बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर पोहोचले होते.

 

बाळासाहेबांची संजूबाबाला 'जादू की झप्पी'
संजय दत्त जेलमध्ये गेला त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं युती सरकार सत्तेत होतं. त्यावेळ बाळासाहेबांनी चक्रं फिरवली आणि तब्बल 18 महिने तुरुंगवास भोगून संजय दत्त बाहेर आला. त्यानंतर लगेचच संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासोबत बाळासाहेबांची भेट घेतली. 'मातोश्री'वर झालेल्या या भेटीत बाळासाहेबांना संजूबाबाला 'जादू की झप्पी' दिली.
 - जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हयात होते, तोपर्यंत शिवसेनेने कधीही संजय दत्तला विरोध केला

नाही. पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेने संजय दत्तच्या दया याचनेवर विरोध दर्शवला होता.

 

मॉरीशसहून परतताना एअरपोर्टवर झाली होती अटक...
 बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या चौकशीत मुंबई पोलिसांना बॉलिवूडच्या लोकांचा यात सहभाग असल्याचे समजले. असे म्हटले जाते, की याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी निर्माता हनीफ कडावालाला बोलावले होते. हनीफने चौकशीमध्ये संजय दत्तच्या नावाचा उल्लेख केला होता.

- त्याकाळात संजय दत्त मॉरीशसमध्ये संजय दत्तच्या 'आतिश' चित्रपटाचे शूटिंग करत होता. संजय 19 एप्रिल 1993 रोजी मॉरीशसहून मुंबईत दाखल झाला आणि पोलिसांनी त्याला विमानतळावरच अटक केली. असे म्हटले जाते, की संजयला अटक करण्यासाठी विमानतळावर 100 हून अधिक पोलिस तैनात होते.

 

टाइमलाइनमध्ये बघा, संदय दत्त केसमध्ये कधी काय-काय घडले?

 

दिनांक                     काय घडले?
19 एप्रिल 1993 मुंबई पोलिसांनी संजय दत्तच्या घराची झडती घेतली. चौकशीत त्यांना एके 56 मिळाली. त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्यात आली.
26 एप्रिल 1993 संजय दत्तने न्यायालयात चुकीची कबुली दिली.
3 मे 1993 संजयची जामिनावर सुटका झाली.
4 मे 1993 त्याचा जामिन फेटाळण्यात आला आणि पुन्हा अटक करण्यात आली.
16 ऑक्टोबर 1995 16 महिने शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्तला जामिन मंजुर झाला.
डिसेंबर 1995 त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यानंतर एप्रिल 1997 मध्ये तो जामिनावर बाहेर आला.
28 नोव्हेंबर 2006 त्याला आर्म्स अॅक्टअंतर्गत दोषी ठरवण्यात आले. टाडा अॅक्टने त्याला इतर आरोपांतून मुक्त केले.
31 जुलै  2007  टाडा कोर्टाने संजय दत्तला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी 6 वर्षांची शिक्षा सुनावली आणि मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या सर्व आरोपांतून मुक्त केले.
2 ऑगस्ट 2007 संजय दत्तची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली.
20 ऑगस्ट 2007 त्याची जामिनावर सुटका झाली. पण दोन दिवसांतच म्हणजे 22 ऑगस्ट रोजी त्याला पुन्हा अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले.
27 ऑगस्ट 2007 सुप्रीम कोर्टाने संजय दत्तचा जामिन मंजूर करुन त्याला सोडले.
21 मार्च 2013      
 सुप्रीम कोर्टाने टाडा कोर्टाचा निर्णय कामय ठेवत संजय दत्तला शिक्षा सुनावली पण 6 वर्षांची शिक्षा कमी करुन ती 5 वर्षांची केली. त्याला चार आठवड्यात सरेंडर करण्याचा आदेश दिला गेला.
17 एप्रिल 2013 संजय दत्तला त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करायचे होते, त्यासाठी त्याने कोर्टाकडे चार आठवड्यांचा कालावधी मागितला होता.
22 मे 2013 त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली. येथे त्याला त्याची उर्वरित शिक्षा अर्थातच 3 वर्षे आणि 6 महिने काढायचे होते. कारण त्याने 16 महिन्यांची शिक्षा आधीच भोगली होती. 
25 फेब्रुवारी 2016 त्याच्या शिक्षेचा कालवधी मे 2016 मध्ये संपणार होता. पण तुरुंगातील त्याची चांगली वर्तणुक बघून त्याला 25 फेब्रुवारी 2016 रोजी मुक्त करण्यात आले.  
 
पुढील स्लाईड्सवर बघा, या घटनेशी संबधित छायाचित्रे...  

 

बातम्या आणखी आहेत...