आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanjay Duttची मुलगी त्रिशालाचे वडिलांसोबत आहे असे नाते, व्यक्त केल्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चित्रपट बॉक्सऑफिवसर चांगली कमाई करत आहे. यामुळे सध्या संजय चांगलाच चर्चेत आहे. अशातच संजय दत्तची मुलगी त्रिशाला हिने एक मनाला स्पर्श करणारे विधान केले आहे. त्रिशाला ही बालपणापासूनच आपल्या आजी-अजोबांसोबत राहिली आहे. तिला विचारण्यात आले की, पालकांपासून वेगळे राहताना कसे वाटते. यावर ती म्हणाली की, त्यांच्यासोबत राहून कसे वाटते हे मला माहिती नाही. यामुळे मला याची जाणिव नाही. 29 वर्षीय त्रिशालाने इंस्टाग्रामवर आपले वडील संजय दत्त आणि तिच्या रिलेशनशीपविषयी सांगितले आहे. संजय दत्तचा बायोपिक संजू चित्रपटात त्रिशाला गायब आहे. यानंतर त्रिशालाने कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चित्रपटामध्ये त्रिशालाची आई आणि संजयची पहिली पत्नी ऋचा शर्माचाही उल्लेख केलेला नाही. 

 

माझा अॅटीट्यूड आणि टेम्पर माझ्या वडिलांसारखा
- एका फॉलोअरने इंस्टाग्रामवर त्रिशालाला विचारले की, - डॅड संजय दत्तसोबत तुझे नाते कसे आहे? यावर त्रिशाला म्हणाली - डॅडसोबत नॉर्मल रिलेशन आहे. लोकांचे जसे वडिलांसोबत असते तसेच आहे. जसे इतर लोक आपल्या वडिलांसोबत फील करतात तसेच मी फील करते. 
- एका यूजरने विचारले की, पालकांशिवाय राहणे कसे वाटते? त्रिशाला म्हणाली- ठिक आहे. मी कधी त्यांच्यासोबत राहिले नाही. यामुळे त्यांच्याशिवाय कसे वाटते याची मला जाणिव नाही.
- तु कोणासारखी आहे आई की वडील? यावर तिने उत्तर दिले की, - माझा अॅटीट्यूड आणि टेम्पर वडिलांसारखा आहे. तर जेंटलनेस आणि लव्हिंग साइड मॉमसारखी आहे. माझी स्टाइल दोघांसारखी आहे.

 

फॅशन वर्ल्डमध्ये नशीब आजमावत आहे त्रिशाला...
त्रिशालाने 2014मध्ये तिचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ड्रीम ट्रेसेज हेयर एक्सटेंशन लाइन सुरु केली. तिने न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस येथून लॉमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्रिशालाचा जन्म 1988 मध्ये झाला होता. ब्रेन ट्युमरमुळे आई ऋचाचे निधन झाल्यानंतर त्रिशाला न्यूयॉर्क येथे तिच्या आजीआजोबा आणि मावशीजवळ राहते.


त्रिशालाने फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये, अशी आहे संजयची इच्छा...
संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले होते, की त्रिशालाने कधीच फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये, असे त्याचे मत आहे. त्रिशालाने दुस-या फिल्डमध्ये नाव कमवावे अशी त्याची इच्छा आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...