आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः वयाच्या 70 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेणारे अभिनेते विनोद खन्ना यांची आज (27 एप्रिल) पहिली पुण्यतिथी आहे. ब्लॅडर कॅन्सरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती. विनोद खन्ना यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरु होते. तेथे दाखल असतानाचा त्यांचा एक फोटो समोर आला होता, त्यामध्ये त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. मृत्यूपुर्वी ते आजारपणामुळे हाडांचा सापळा झाले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. आजारपणाचं समजल्यानंतर विनोद खन्ना 2015 मध्ये शाहरुख-काजोलच्या ‘दिलवाले’नंतर पुन्हा चित्रपटात दिसले नाहीत.
विनोद खन्नांच्या मृत्यूची पसरली होती खोटी बातमी...
- मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या निधनाची खोटी बातमी पसरली होती.
- विनोद खन्नांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर मेघायलमधील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी दोन मिनिटांचे मौन ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
- मेघालयची राजधानी शिलाँग येथे स्वच्छ भारत अभियानाच्या एका कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे पाक्टी महासचिव डेविड खरसाती यांनी विनोद खन्ना जिवीत असल्याचे स्पष्ट करुन माफी मागितली होती.
विनोद खन्नांच्या आजारपणाबद्दल ठेवण्यात आले होते लपवून...
- 144 चित्रपटांमध्ये झळकलेले विनोद खन्ना यांना नेमका कोणता आजार जडला होता, हे अनेक दिवस लपवून ठेवण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या आजारपणाविषयी कुणालाही ठाऊक नव्हते.पण नंतर त्यांना कॅन्सर झाल्याचे उघड झाले होते.
- रिपोर्ट्सनुसार, विनोद खन्ना यांची मुलगी श्रद्धा हिला धक्का पोहोचू नये, यासाठी त्यांच्या पत्नी कविता यांनी त्यांच्या आजारपणाविषयी कुणाला काहीही सांगितले नव्हते.
- विनोद खन्ना यांचे दोनदा लग्न झाले होते. पहिली पत्नी गितांजलीपासून त्यांना राहुल आणि अक्षय ही दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी कवितापासून साक्षी हा एक मुलगा आणि श्रद्धा ही एक मुलगी आहे.
सुनील दत्त घेऊन आले होते विनोद खन्नांना इंडस्ट्रीत...
- विनोद खन्ना यांची भेट एका पार्टीत सुनील दत्त यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी सुनील दत्त त्यांचा धाकटा भाऊ सोम दत्तला त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून लाँच करणार होते. त्यासाठी ते ‘मन का मीत’ हा चित्रपट बनवत होते. त्यांना चित्रपटात सोम दत्तच्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा हवा होता.
- विनोद खन्ना यांची पर्सनॅलिटी, उंची बघून सुनील दत्त यांनी ही भूमिका विनोद खन्ना यांना ऑफर केली होती. 1968 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पुढील स्लाईड्सवर वाचा, विनोद खन्ना यांना व्हायचे होते इंजिनिअर...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.