आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Real Life Kamli Paresh Ghelani Emotional Note For Sanju After Watching Film

'Sanju' पाहून इमोशनल झाला संजय दत्तचा रियल लाइफ मित्र 'कमली', लिहिला मॅसेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटाने 7 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या अभिनयाची सर्व स्थरातून स्तुती होत आहे. यासोबतच त्याचा मित्र विक्की कौशलचीही स्तुती होत आहे. रणबीर संजय दत्त बनला आहे. तर विक्की कौशल हा त्याच्या फ्रेंड कमलीच्या भूमिकेत आहे. आता रिअल कमली म्हणजे संजयचा सर्वात जवळचा मित्र परेश घेलानीने हा चित्रपट पाहिला आणि खुप इमोशनल झाला. परेशने सोशल मीडियावर संजय आणि त्याच्या मैत्रीचा एक इमोशनल मॅसेज लिहिला आहे.


परेश म्हणाला - मला फक्त संजयची गळाभेट घेऊन रडायचे आहे...
- परेश घेलानीने लिहिले की, "अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. मी पुन्हा एकदा हे सुरु करत आहे. सुरुवात ही माझा भाऊ संजयसाठी एक नोट लिहून करतो, जे ब-याच काळापासून माझ्या मनात आणि डोक्यात लिहित होतो, आता ती नोट सर्वांसमोर आहे."
- "संजू चित्रपट पाहिल्यानंतर मी इमोशनली सुन्न झालो. जो काळ निघून गेला त्यासाठी मला फक्त संजयला मिठी मारुन रडायचे आहे. आयुष्याच्या चढ-उतारात आम्ही एकमेकांसोबत उभे राहिलो आणि आपल्या लोकांना गमावले. त्या चुका आम्ही सुधारु शकत नाही, ती ताकद आम्हाला एकमेकांपासून मिळाली."

- परेशने पुढे लिहिले की, "आता पुर्ण जग आमची कथा शेअर करत आहे. त्याने मला त्याच्या आयुष्याचा भाग बनवले. प्रत्येक वेळी पडल्यावर कसे उठायचे हे शिकवले. यावेळी माझ्या मनात खुप वेगवेगळे इमोशन येत आहेत. आपल्यापैकी किती लोकांकडे असा मित्र आहे जो चांगल्या, वाईट प्रत्येक काळात भाऊ आणि मेंटरप्रमाणे साथ देतो."
"हा काळ आपल्या दोघांसाठी सोपा नव्हता. वाईट परिस्थितीचा कसा सामना करावा हे मी या प्रवासात शिकलो. भुतकाळातील चुका आणि यामधून बाहेर आल्यानंतर तु ज्या प्रकारचा माणुस बनला, हे सर्व स्तुती करण्याजोगे आहे. तुझ्यासारखा मित्र आणि भाऊ प्रत्येकाला हवा असतो."
- "आपल्या मैत्रीने अनेक अडचणींचा सामना केला. आपण प्रत्येक परिस्थितीत एकत्र उभे राहिलो आणि आजही आपण एकत्र आहोत. संजू, माझ्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी धन्यवाद, मला आपलं समजलं म्हणून धन्यवाद, मला प्रत्येक वेळी साथ देण्यासाठी धन्यवाद... Keep Roarrrring.... tiger!!।"

 

कोण आहेत परेश घेलानी?
- संजय परेशला प्रेमाने 'परया' बोलावतो. दोघांची मैत्री 'रॉकी' चित्रपटा दरम्यान झाली. तेव्हापासून आतापर्यंत एकमेकांच्या आयुष्यात दोघांचे महत्त्व आहे.
- संजयच्या वाईट काळात परेश नेहमी त्याच्यासोबत उभा राहिला आहे. सध्या परेश लॉस एंजेलसमध्ये राहतो.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...