आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranbir Kapoor Starrer Sanju: Sanjay Dutt Said Mosquitoes Bite And Die Right There Because Of Drugs Overdose In Blood

संजूला चावल्यावर मरुन जात होते डास, ड्रग्स ओव्हरडोजची कहानी स्वतः संजय दत्तच्या तोंडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणबीर कपूर स्टारर चित्रपट 'संजू' रिलीज झाला आहे. चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से सांगितले आहे. याच वेळी संजय 'एन्टटेन्मेंट की रात' या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला. त्याने आपल्या ड्रग्स डेजचा एक किस्सा शेअर केला. संजयने सांगितले की, त्याच्या शरीरात ड्रग्सचा एवढा ओव्हरडोज झाला होता की, त्याला डास चावला तर तो मरुन जात होता.


संजयने सांगितले - "एक काळ होता तेव्हा मी खुप नशा करायचो. मला आठवते की, डास मला चावला तर माझे रक्त पिऊन तो उडू शकत नव्हता. तो थोडा वेळ एकाठिकाणी बसुन राहायचा आणि नंतर जमीनीवर उल्टा पडायचा. आता मी हे सर्व आठवतो तर मला हसू येते. मी आजच्या तरुणांना एवढंच सांगेल की, ड्रग्सपासून दूर राहा. कारण कुटूंब आणि करिअरपेक्षा मोठा कोणताही नशा नाही."


जेलमध्ये मुसलमान भाऊ ठेवत होते संजयची काळजी
- संजय दत्तने त्या काळातील किस्सा ऐकवत सांगितले की, "रमजानच्या काळात जेलमध्ये वेगळाच माहौल असायचा. मुस्लिम बांधवांना सकाळी सहरीमध्ये गरम चहा आणि नास्ता दिला जायचा. अशा वेळी मुस्लिम बांधव मलाही उठवून घेऊन जायचे आणि म्हणायचे की, गरम चहा मिळतो तर चल पिऊन घे."

 

जेलमध्ये आरजेचे काम करायचा संजय
- संजयने सांगितले की, "मी जेलमध्ये होतो तेव्हा RJचे काम करायचो. मी यरवडा जेलचा आरजे राहिलो आहे. यामुळे अनेक लोक माझे फॅन बनले. तिथल्या लोकांना माझा आवाज ऐकायला खुप आवडत होते. त्या लोकांमुळेच मी जेलमध्ये वेळ घालवू शकलो."


संजय - मुलं पहिले शिक्षण पुर्ण करतील
- संजयने शोमध्ये आपल्या मुलांविषयीही बातचीत केली. त्याला वाटते की, मुलांनी पहिले शिक्षण पुर्ण करावे, डिग्री घ्यावी आणि नंतर त्यांना जे बनायचे आहे, त्यासाठी मी त्यांना मदत करेल.
- संजयने आपल्या अभ्यासाविषयी सांगितले की, मी गणितात खुप कच्चा होतो. म्हणून मला वाटते की, मुलांना यांमध्ये चांगले राहावे. सध्या संजय मुलांना क्राफ्ट आणि पेंटिंग्समध्ये मदत करतो.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...