आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तने सुरु केली कलंकची शूटिंग, दिसणार लाहोरची स्वतंत्रपुर्व आजाद मंडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड : मुंबईमध्ये एप्रिल 2018 पासून कलंकची शूटिंग सुरु झाली आहे. याच काळात गेल्या महिन्यात माधुरी दीक्षितचा कथक डान्सरचा लुक आउट झाला होता. आता संजय दत्तनेही कलंकची शूटिंग सुरु केली आहे. या चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट दिसणार आहेत. या चित्रपटासोबतच संजय दत्त अजून तीन चित्रपट करत आहे. तर 29 जूनला संजयचा बायोपिट 'संजू' रिलीज होत आहे. यामध्ये रणबीर कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. 


एप्रिल 2019 मध्ये रिलीज
- अभिषेक वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा कलंक हा चित्रपट एप्रिल 2019 मध्ये रिलीज होईल. स्वतंत्रपुर्व काळातील कथा या चित्रपटात आहे. वरुण हा अखंड भारतातील एका मुस्लिम लोहाराची भूमिका साकारत आहे. या व्यक्तीची लाहौरच्या हीरा मंडीमध्ये दुकान होते.
- ही मंडी मुगलांच्या काळात प्रसिध्द होती. तेव्हा तिथे गीत-संगीताच्या महेफिली सजत होत्या. परंतू इंग्रांना त्या काळात ही मंडी बदलायची होती. यामुळे वरुणचे पात्र नाराज होते आणि इंग्रजांविरुध्द आवाज उठवते.


21 वर्षांनंतर संजयसोबत
- कलंक चित्रपटात माधुरी आणि संजय दत्त जवळपास 21 वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.
- संजय दत्त आणि माधुरी दीक्षित 1997 मध्ये 'महानता' या चित्रपटात एकत्र दिसले होते. 
- यासीर अहमदने आपल्या ''संजय दत्त: द क्रेजी अनटोल्ड लव स्टोरी ऑफ बॉलीवुड बॅड बॉय'' पुस्तकात संजय-माधुरी दीक्षितच्या अफेअरचा उल्लेख केला आहे.

 

संजयजवळ अजून तीन चित्रपट
- संजय दत्त जवळ कलंक चित्रपटासोबतच अजून तीन चित्रपट आहे. यामध्ये तुग्मांशु धूलियाचा साहब, बीवी और गँगस्टर 3 यांचे नाव सर्वात पहिले येते. या चित्रपटात संजयसोबत जिम्मी शेरगिल, माही गिल आणि चित्रांगदा सिंह आहेत.
- दूसरा चित्रपट गिरीश मलिक यांनी डायरेक्ट केला आहे. 'तोरबाज' हे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात संजय दत्त, नरगिस फाखरी, सुमित व्यास आणि राहुल देव आहेत.
- तिसरा चित्रपट अर्जुन कपूर आणि कृती सेननसोबत आहे. हा आशुतोष गोवरीकर यांचा 'पानीपत' हा चित्रपट आहे. हे तिनही चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होतील.

 

संजूमध्ये दिसणार आयुष्याचा प्रवास
- राजकुमार हीरानी यांनी डायरेक्ट केलेला 'संजू' हा चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
- चित्रपटात त्याची ड्रग्सची सवय, जेल प्रवास, वादग्रस्त वैवाहिक आयुष्य अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
  

बातम्या आणखी आहेत...