आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​20cr च्या बजेटमध्ये तयार होतोय ‘साहब, बीवी, गैंगस्टर-3', फक्त 1.5cr मध्ये बनला होता पहिला भाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'साहब, बीवी और गँगस्टर' तिग्मांशु धुलियाचा यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग २७ जुलै रोजी प्रदर्शित होईल. इतर भागाप्रमाणेच साहेब आणि बीवीची भूमिका जिमी शेरगिल आणि माही गिल साकारणार आहेत. यंदा मात्र गँगस्टरची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. याच्या पहिल्या भागात रणदीप हुड्डा आणि दुसऱ्या भागात इरफान खानने गँगस्टरची भूमिका साकारली होती. 


संजयमुळे चित्रपटाला जास्त खर्च आला आहे. खरं तर, तिग्मांशुने पहिला भाग फक्त १.५ कोटी रुपयांत बनवला होता. आता याचा तिसरा पार्ट २० कोटी रुपयांत बनला आहे. या चित्रपटाला १५०० स्क्रीनवर रिलीज करण्याची योजना आहे. संजयचा कमबॅक चित्रपट 'भूमि' फ्लॉप झाल्यानंतरदेखील त्याच्यावर एवढा मोठा डाव खेळला जात आहे. त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे त्याच्यासोबत हा चित्रपट केल्याची चर्चा आहे. त्याने पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन साधले आहे. शिवाय कामाविषयी त्याचे समर्पण पाहून निर्माते-दिग्दर्शकांचा तो आवडता आहे. 


निर्माते राहुल मित्रा यांनी सांगितले...
या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शूटिंगदरम्यान मी आणि तिग्मांशु धुलिया मित्र झालो होतो. तिग्मांशुसोबत मैत्रीचा हक्क दाखवण्यासाठी दुसरा भाग बनवण्यात आला होता. आता हे नाते टिकावे म्हणून तिसरा भाग बनवण्यात आला. हा भाग बनवण्यात मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावली. या प्राेजेक्टमध्ये माझ्यासोबत दोन्ही जिवलग मित्र आहेत. त्यांच्यासोबत चांगले नाते आहे. एक तिग्मांशु माझा चांगला मित्र आहे आणि आता संजयदेखील माझा जिगरी मित्र झाला आहे. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत चित्रपटावर चांगलाच पैसा खर्च केला आहे. 
असो, 'साहब, बीवी और गँगस्टर' याच्या दोन भागांसाठी आधी मर्यादित बजेट होते. याचे शूटिंगही गुजरातमध्ये झाले होते. खरं तर गुजरातच्या सौराष्ट्र आणि इतर जागी कमी किमतीत शूट करण्यसाठी जुने किल्ले आणि महाल मिळतात. मात्र, यंदा बजेट असल्यामुळे याचे शूटिंग राजस्थानच्या महालामध्ये करण्यात आले. डझनभर व्हिंटेज गाड्यांचा वापर करण्यात आला. संजय दत्त राजा-महाराजाच्या कुटुंबातील धनाढ्य व्यक्ती दाखवण्यात आला आहे. त्याच्या राज्याभिषेकाच्या दृश्यासाठी हजारो लोकांची गर्दी दाखवण्यात आली आहे. शिवाय या वेळी नफिसा अली आणि कबीर बेदीसारख्या कलावंतांनादेखील घेण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...