आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Sanju' चित्रपटाने 12 दिवसात केली जवळपास 300 कोटी कमाई, टॉप 10 हिंदी चित्रपटांमध्ये समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संजू चित्रपट बॉक्सऑफिसवर नॉनस्टॉप कमाई करत आहे. चित्रपट लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होऊ शकतो. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट गेल्या 12 दिवसांपासून कमाई करत आहे. दूस-या चित्रपटांची रिलीज डेट नसल्यामुळे संजू चित्रपटाला फायदा मिळत आहे. 13 जुलैला रिलीज होणारा सूरमा आणि द एंट मॅन रलीज होण्यापुर्वीच संजू नवीन रेकॉर्ड बनवू शकतो.

 

पहिल्या तीन दिवसात सेंच्यूरी
राजकुमारी हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसातच 100 कोटींचा आकडा पार केला होता. एका आठवड्यात संजू चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला होता. आता 12 दिवसात संजूने 275 कोटी क्रॉस केले आहे. 
- ट्रेड एनालिस्ट्सचा अंदाज आहे की, लवकरच हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणार आहे.


टॉप 10 लिस्टचा 9 वा चित्रपट
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने सोमवारी 9 जुलैला एक ट्वीट करुन चित्रपटाची रॅकिंग सांगितली होती. तरणच्या लिस्टनुसार 'संजू' सर्वात जास्त कमाई करणा-या हिंदी चित्रपटाच्या टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झाला आहे.
- लिस्टचा पहिला चित्रपट बाहुबली 2 आहे, दूसरा दंगल, तिसरा पीके, चौथा टायगर जिंदा है, पाचवा बजरंगी भाईजान, सहावा पद्माव, सातवा सुल्तान आणि आठवा धूम 3 आहे.
- संजूने सुरुवातीच्या 11 दिवसात वर्ल्ड वाइल्डमध्ये 481 कोटींचा बिझनेस केला आहे. 

 

संजूचे आतापर्यंत कलेक्शन असे आहे

 

ओवर ऑल

तारीख

दिन कलेक्शन
पहिला दिवस 29 जून शुक्रवार 34.75  कोटी
दूसरा दिवस 30 जून शनिवार 38.6 कोटी
तीसरा दिवस 1 जुलै रविवार 46.71 कोटी
चौथा दिवस  2 जुलै सोमवार 25.35 कोटी
पाचवा दिवस 3 जुलै मंगलवार 22.1 कोटी
सहावा दिवस  4 जुलै बुधवार 18.9 कोटी
सातवा दिवस  5 जुलै गुरुवार 16.1 कोटी
आठवा दिवस  6 जुलै शुक्रवार 12.90 कोटी
नववा दिवस 7 जुलै शनिवार 22.02 कोटी
दहावा दिवस  8 जुलै रविवार 28.05 कोटी
अकरावा दिवस 9 जुलै सोमवार 9.25 कोटी
बारावा दिवस 10 जुलै मंगलवार 7.50 कोटी
एकुण कलेक्शन     282 कोटी

बातम्या आणखी आहेत...