आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान म्हणाला, संजय दत्तनेच करायला हवी होती स्वतःची भूमिका, मिळाले असे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानने रणबीरवर हल्ला बोल करत म्हटले होते, संजय दत्तची भूमिका करण्याची हिम्मत कोणातही नाही. संजयने स्वतःच ही भूमिका करायला हवी होती. त्यावर 'संजू'चे डायरेक्टर राजकुमार हिराणी यांनी माझ्याही मनात हे आले होते, असे उत्तर दिले. 


मुंबई - 'संजू' चे डायरेक्टर राजकुमार हिराणी यांनी सलमान खानला रणबीरवर टीका केलेल्या स्टेटमेंटप्रकरणी उत्तर दिले आहे. चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमान म्हणाला होता, दुसरा एखादा अॅक्टर संजय दत्तची भूमिका कशी करू शकतो. विशेषतः संजय दत्तच्या जीवनातील अखेरच्या 8-10 वर्षांचा भाग. त्यात तर त्यानेच अॅक्टींग करायला हवी होती. इतर कलाकारांत एवढा दम नाही की ते सलमानचे पात्र पडद्यावर जीवंत करू शकेल. 


हिराणी म्हणाले, मलाही वाटले पण...
- राजकुमार हिराणी यांनी एका मुलाखतीत म्हटले, चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यात संजय दत्तलाच भूमिका करायला लावण्याचा विचार माझ्याही मनात आला होता. पण ते विचित्र वाटेल असे वाटले. कारण चित्रपटाच्या बहुतांश भागात रणबीर दिसेल आणि शेवटी संजय दत्त यामुळे लोक कनेक्ट होऊ शकणार नाहीत. 


रणबीरने दिले आहे उत्तर 
रणबीरने सलमानच्या या वक्तव्याला आधीच उत्तर दिले आहे. तो म्हणाला, ज्यावर चित्रपट बनतोय त्यानेच भूमिका करणे हे कधीही झालेले नाही. कारण तसे झाल्यास त्या पात्राचा प्रभाव कमी होतो. मला आधीच माहिती होते की माझी संजय दत्तशी तुलना केली जाईल. त्यामुळे मी प्रामाणिकपणे काम केले आहे. मग संजय दत्तचा 40 व्या वर्षातील रोल असो की 20 व्या वर्षातील. लोकांना असे वाटणे महत्त्वाचे की संजयची भूमिका करणारा सशक्त कलाकार त्यांच्यासमोर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...