आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू' चे नवीन पोस्टर, 'खलनायक' च्या लूकमध्ये दिसला रणबीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : राजकुमार हिराणी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित संजू या आगामी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर आज रिलीज झालेय. या नवीन पोस्टरमध्ये रणबीर 'खलनायक' चित्रपटातील संजय दत्तच्या लूकमध्ये दिसतोय. यामध्ये रणबीरचे केस लांब दिसत आहेत. त्याच्या कानात बाळी घातलेली दिसतेय. यामध्ये त्याचे डोळेही हुबेहूब संजय दत्त सारखे दिसत आहेत. 

 

टीजरमध्येही दिसले विविध अवतार 
संजूचे टीजरही नुकतेच रिलीज झाले. यामध्ये रणबीर संजय दत्तच्या विविध रुपयांमध्ये दिसला. एक मिनिटं 23 सेकंदांच्या या टीजरमध्ये रणबीर आपली छाप सोडतोय. यामधील अनेक सीन्स संजय दत्तच्या खासगी आयुष्याविषयी उत्सुकता निर्माण करतात. टीजरमध्ये संजय दत्तच्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संजय आजवर आपल्याला खासगी आयुष्यात ज्या-ज्या लूकमध्ये दिसला, ते सर्व लूक टीजरमध्ये बघायला मिळत आहेत. या लूकमध्ये रणबीर अगदी हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपटातील लूक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...