आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanju Not Seen By Crime Reporter Baljeet Parmar Trolls Abuse Him On Social Media

Sanjay Dutt ची बातमी ब्रेक करणा-या पत्रकाराने अजून नाही पाहिला \'संजू\', सांगितले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्‍क - एप्रिल 1993मध्‍ये मुंबई बॉम्‍ब ब्‍लास्‍टनंतर क्राइम रिपोर्टर बलजीत यांनी संजय दत्‍तकडे एके-56 रायफल असल्‍याची बातमी सर्वप्रथम बातमी ब्रेक केली होती. ही तिच बातमी आहे ज्‍यामुळे संजय दत्‍तला मुंबई पोलिसांनी टाडा आणि आर्म्‍स अॅक्‍ट अंतर्गत अटक केली होती.  


यामुळे पत्रकार बलजीत यांनी पाहिला नाही संजू 
- यासंदर्भात बलजीत यांनी सोशल मिडीयावर एक पोस्‍ट टाकली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी लिहिले आहे की, 'संजूच्‍या रिलीजनंतर मला शेकडो कॉल आणि मॅसेजेस आले. संजू सिनेमावर प्रतिक्रिया द्या, अशी सर्वांची विनंती होती. त्‍या सर्वांना मी सांगू इच्छितो की, मी सिनेमे पाहत नाही. मी शेवटचा सिनेमा 1997मध्‍ये पाहिला होता.' 
- या पोस्‍टच्‍या शेवटी आपण संजू सिनेमा का पाहणार नाही, हे बलजीत यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यांनी लिहिले आहे की, 'ड्रग्‍स घेणे, शेकडो महिलांसोबत झोपणे, समाज आणि सिस्‍टम यांना आपल्‍या चुकांसाठी जबाबदार धरणे, स्‍वत:च्‍या मर्जीने गुन्‍हेगारी कारवायांत सहभागी होणे, मागील कृत्‍यांचा कोणताही पश्‍चाप नसणे, सिंपथी कार्ड खेळणे. हेच सर्व संजू सिनेमात असेल तर तो न पाहण्‍याचा माझा निर्णय चांगलाच असल्‍याचे मी समजतो.   


संजय दत्‍तला सरेंडर करण्‍यास सांगितले होते
संजू सिनेमाच्‍या रिलीजनंतर बलजीत यांनी मुंबई ब्‍लास्‍टविषयी आपले काही अनुभव सोशल मिडीयावर शेअर केले.  त्‍यावरून त्‍यांना अनेकांनी ट्रोल केले.  याविषयी बलजित यांनी सांगितले की, 'मी जेव्‍हा सांगितले की, मुंबई ब्‍लास्‍टची रिपोर्टींग करत असताना मी संजय दत्‍तपर्यंत कसा पोहोचलो. तर अनेकांना हे खरे वाटले नाही. मला छोटा राजनने मारण्‍याचा प्रयत्‍नही केला होता, हेही अनेकांना खोटे वाटले. याविषयी काहीजण म्‍हणाले की, तु काय तुर्रम खॉं आहेस जे छोटा राजन तुला मारण्‍याचा प्रयत्‍न करेल.' 

- अशा टीकांकडे मी दुर्लक्ष करतो. उलट संजय दत्‍तकडे एके-56 रायफल आहे हे कळाल्‍यावर मी त्‍याला त्‍या बंदुका सरेडंर करण्‍यास सांगितले होते. मात्र संजय दत्‍तने माझे ऐकले नाही. 

- बलजीत यांनी आपल्‍या रिपोर्टींगमध्‍ये सांगितले होते की, ब्‍लास्‍ट होण्‍याच्‍या 10 दिवसांपूर्वी संजय दत्‍तच्‍या घरी हत्‍यारांची गाडी पोहोचली होती. त्‍यानंतर अबु सालेमच्‍या साथिदारांनी ती हत्‍यारं तेथून परत नेली. 

 

बातम्या आणखी आहेत...