आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanju Opening Day Blast Advance Booking Reached At 33 Cr Prediction For Biggest Opener Movie 2018

\'Sanju\'चा रिलीज पुर्वीच ब्लास्ट, अॅडव्हान्स बुकिंगध्ये 33 कोटींचा आकडा पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : रणबीर कपूर स्टारर संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चित्रपटाने रिलीजपुर्वीच ब्लास्ट केला आहे. ट्रेड एनालिस्टने अंदाज लावला आहे की, संजू हा चित्रपट 'रेस 3' पेक्षा जास्त कमाई करणारा 2018 चा सर्वात हिट चित्रपट ठरेल. आतापर्यंत 'संजू' चित्रपटाच्या फर्स्ट डे शोच्या 33 कोटींच्या अॅडव्हान्स बुकिंग झाल्या आहेत. तर 'रेस 3' चित्रपटाला रिलीज डेटवर 30 कोटींची बुकिंग मिळाली होती. 'रेस 3' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 29.17 कोटी होती.
ब्रिटिश सेन्सॉरनेही केले क्लीअर


ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट केले होते की, 'संजू' चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉरने सर्टिफेकिट 15 सोबत क्लीअर केले आहे. संजूचा टोटल रन टाइम 158 मिनिटे 8 सेकंदांचा आहे. दोन तास 38 मिनिटे आणि 8 सेकंदात चित्रपट कम्प्लीट होईल.

 

'रेस 3' सोबत असेल 'संजू'ची स्पर्धा
सलमान खानच्या 'रेस 3' चित्रपटाने ईदपुर्वीच अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून 30 कोटींचा बिझनेस केल्याचा अंदाज होता. ओपनिंग डेला हाआकडा 29.17 कोटींपर्यंत पोहोचला आणि 2018 चा हा सर्वात मोठा ओपनर बनला.

असे आहे 'संजू'चे रिलीज गणित
भारतामध्ये एकुण स्क्रीन 4100
65 देशात एकुण स्क्रीन 1300
संजूच्या एकुण स्क्रीनिंग 5400
मुंबईमध्ये एकुण शो 870
दिल्ली एनसीआरमध्ये शो 326
अहमदाबादमध्ये एकुण शो 269

 

रणबीरच्या करिअरमधील दूसरा मोठा हिट
'संजू' हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट असल्याचे मानले जात आहे. यापुर्वी 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 190 कोटींची कमाई केली होती. रणबीरच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 19 कोटींची कमाई केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...