आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Sanju\'मुळे पुढे ढकलण्यात आला हॉलिवूड चित्रपट, आता \'सूरमा\'सोबत होणार रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: रणबीर कपूरचा 'संजू' चित्रपट बॉक्सऑफिसवर सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाने रिलीजच्या दूस-या आठवड्यातही आपली जादू कायम ठेवली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 34 कोटीं कमावत चांगलीच ओपनिंग केली होती. चित्रपटाने 3 दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले. अशा प्रकारे चित्रपटाने आतापर्यंत 186.41 कोटींचे कलेक्शन केले आहे.


6 जुलैला रिलीज होणार नाही 'एंट मॅन अँड द वॅस्प': कार्निवल सिने चेनचे प्रोग्रामिंग हेड राहुल कडबेटनुसार, 'संजू' लोकांना पसंत पडतोय. संध्याकाळचे शोज वर्किंग डेच्या 50 पटींनी जास्त फायदा मिळवत आहेत. ही गोष्ट खुप मोठी आहे. याच कारणांमुळे आम्ही या चित्रपटाचे शो आणि स्क्रीन कमी करत नाहीये. याच कारणांमुळे 6 जुलैला प्रदर्शित होणारा हॉलिवूडचा 'एंट मॅन एंड द वेस्प' रिलीज होणार होता. आता हा चित्रपट पुढच्या आठवड्यात 13 जुलैला 'सूरमा'सोबत रिलीज होणार आहे.

 

'संजू'मुळे नंतर होणार रिलीज
'एंट मॅन अँड द वेस्प' चित्रपट 'ऐवेंजर्स'चा स्पिन ऑफ आहे. भारतातही या चित्रपटाच्या भूमिकांविषयी क्रेज होती. स्पिन ऑफ जॉनरचा चित्रपट 'नाम शबाना' होता. तर 'बेबी'मध्ये तापसीच्या भूमिकेत शबानाची बॅक स्टोरी होती. 'एंट मॅन अँड द वेस्प' चित्रपट असाच आहे. हा चित्रपट 'एवेंजर्स'च्या प्रसिध्द कॅरेक्टरची बॅक स्टोरी आहे. हे चित्रपट भारतातही खुप प्रसिध्द आहेत. परंतू सध्या 'संजू'ला मिळत असलेली प्रसिध्दी पाहून हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

 

तिस-या आठवड्यातू स्क्रीनही 'संजू'च्या नावे
आयनॉक्स सिने चेनचे व्हाइस प्रेसिडेंट राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'कमर्शियल चित्रपट नेहमीच दूस-या आठवड्यात उतरताना दिसतात. परंतू संजूच्या बाबतीत असे झाले नाही. लोकांमध्ये अजूनही चित्रपटाविषयी क्रेज आहे.' 'बाहुबली' अनेक भाषांमध्ये प्रदर्शीत झाला होता. तेव्हा चित्रपटाने दूस-या आठवड्यात 200 कोटींचे कलेक्शन केले होते. परंतू 'संजू' फक्त एकाच भाषेत रिलीज झाला आहे आणि तरीही चित्रपट दूस-या आठवड्यात 200 कोटींचा आकडा गाठणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...