आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू'ची क्रेज फक्त भारताताच नाही तर विदेशांमध्येही पाहायला मिळतेय. रिपोर्ट्सनुसार दुबई सरकारने या चित्रपटासाठी 24 तास थिएटर सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. फक्त विकेंडच्या दोन दिवसच चित्रपटगृहांना ही परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी सकाळी 4.30 ते 6 वाजताचे शो प्रेक्षकांसाठी खुले असणार आहेत. रिपोर्ट्सनुसार दुबईतील लोक संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी खुप एक्साइडेट होते, त्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर गर्दी केली. लोकांचा हा उत्साह पाहून सरकारने हा निर्णय घेतला.
वर्ल्डवाइड 202 आहे संजूची कमाई
- राजकुमार हिरानीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला आणि रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाने भारतात चार दिवसात 145 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी चांगलीच कमाई केली. चौध्या दिवशी चित्रपटाने 25 कोटी कमावले वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर कमाईचे तीन दिवसांचे आकडे आले आहेत. जवळपास 202 कोटींची कमाई केली आहे. विदेशांमधील कमाई विषयी बोलायचे झाले तर चित्रपटाने यूएस आणि कॅनडामध्ये जवळपास 17 कोटी, गल्फ देशांत जवळपास 12 कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये 4.5 कोटी आणि यूकेमध्ये जवळपास 4 कोटींची कमाई केली आहे. पाकिस्तानमध्येही चित्रपट चांगली कमाई करत आहे. येथे जवळपास 5.5 कोटींचे कलेक्शन झाले आहे. 29 जूनला हा चित्रपट रिलीज झाला. यामध्ये रणबीर कपूरसोबत परेश रावल आणि विक्की कौशलच्या अभिनयाची चांगलीच स्तुती होत आहे. चित्रपटात दीया मिर्जा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, बोमन ईरानी आणि जिम सर्भ प्रमुख भूमिकेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.