आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: दीपिकचा खुलासा, बॉलिवूडमध्ये मलाही भेदभावाचा सामना करावा लागला, लोक देत होते हा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आजच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका मोठा खुलासा केला आहे. दीपिकानुसार सुरुवातीच्या काळात तिलाही बॉलिवूडमध्ये महिला असल्यामुळे भेदभावाला बळी पडावे लागले. दीपिकाने सांगितले की, मला सांगितले जात होते की, मी जेव्हा बूब जॉब करेल, तेव्हा माझ्यावर चित्रपटाच्या डायरेक्टरचे लक्ष जाईल. दीपिकाने हा खुलासा इंटरनॅशनल मॅगझीन ईवनिंग स्टँडर्सला दिलेल्या मुलाखतीत केला. या मॅगझीनच्या जूनच्या अंकात दीपिका झळकणार आहे. दीपिका यामध्ये #MeToo कॅम्पेनविषयी बोलली. दीपिकाने सांगितले की - मला वाटते की, आता भारतात याविषयी बोललो जात आहे. आम्ही सर्व यामध्ये एकत्र आहोत.

 

काय आहे #MeToo कॅम्पेन?
जगभरात महिला आपल्या विरुध्द झालेला भेदभाव आणि लैंगिक शोषणाविषयी सांगत आहेत. याला #MeToo कॅम्पेन असे नाव दिले आहे. 5 ऑक्टोबर, 2017 मध्ये हॉलिवूड अभिनेत्री रोज मॅकगोवेन एश्ले जुडने सर्वात पहिले डायरेक्टर हार्वे विंस्टिनविरुध्द आवाज उठवला. यानंतर अनेक आरोप समोर आले. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी विंस्टिंनवर रेप आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावला. एंजेलीना जोली आणि सलमा हायेकसारख्या मोठ्या अभिनेत्रींनीही विंस्टिन वर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. आतापर्यंत #MeTooकॅम्पेनसोबत लाखो महिलांचा जोडल्या गेल्या आहेत. कॅम्पेनसोबत अनेक भारतीय सेलेब्स जोडले गेले आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, मल्लिका दुआ यांच्या नावाचा समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...