आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड डेब्यूपुर्वी कायद्याच्या कचाट्यात अडकली सैफची मुलगी SARA

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा अली खान करिअरमधील पहिला चित्रपट 'केदारनाथ' च्या रिलीजपुर्वी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. 'केदारनाथ' चे डायरेक्टर-प्रोड्यूसर अभिषेक कपूरने तिच्यावर चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप लावून तिला कोर्टात खेचले आहे. अभिषेक म्हणाला की, सारा 'केदारनाथ' च्या कॉन्ट्रॅक्टवर दुर्लक्ष करुन डायरेक्टर   रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटाला डेट्स देत आहे. 


शुक्रवारी होती कोर्टाची तारीख
- शुक्रवारी कोर्टाने दोन्हीही पक्षांची बाजू जाणून घेतली. कोर्टामध्ये अभिषेककडून शरण जग्तियानी आणि साराकडून गौरव जोशीने आपापली बाजू मांडली. कोर्टाने दोन्ही पक्षांना सेटलमेंट करण्यास सांगितले. परंतू ते तयार झाले नाही. कोर्ट आता मंगळवारी याविषयीची सुनावणी करणार आहे. 

 

सारावर खुप रागावला आहे अभिषेक
- अभिषेक कपूरच्या एकाजवळच्या सूत्राने सांगितले की, तो यामुळे सारावर खुप रागावला आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाची शूटिंग अजून बाकी आहे आणि तिने दूसरा चित्रपट साइन केला. सूत्राने सांगितले की, "अभिषेक रागावला आहे आणि निराश आहे. हे ठिक झाले नाही, कारण 'सिम्बा' मुळे 'केदारनाथ' मधील साराची शूटिंग अडकली आहे. तिने कोणत्याही परिस्थितीत अभिषेकचा चित्रपट पुर्ण करायला हवा. 'सिम्बा'ची शूटिंग सुरु करुन तिने कॉन्ट्रॅक्टचे उल्लंघन करायला नको."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...