आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरोज खानचे वादग्रस्त वक्तव्य : फिल्म इंडस्ट्री मुलींना रेप करुन सोडून देत नाही, रोजी-रोटी देते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली : एकीकडे महिला अत्याचारांविरोधात संपुर्ण देश संतप्त आहे. तर दूसरीकडे या घटनांचे समर्थन होताना दिसतेय. आता फिल्म इंडस्ट्रीचे लोकही याचे समर्थन करण्यात शामिल होत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिध्द नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनीही एक व्यक्तव्य केलेय. सरोज खान यांनी सांगलीच्या एका कार्यक्रमात कास्टिंग काउच संदर्भातील हे वक्तव्य केले.


काय बोलल्या सरोज खान?
- सोमवारी सांगलीमध्ये फ्यूजन डान्स अकॅडमीकडून एक दिवसीय डान्स प्रशिक्षणशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या उपस्थित होत्या. सरोज म्हणाल्या की, कास्टिंग काउच इंडस्ट्रीसाठी काही नवीन गोष्ट नाही. हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये दुष्कर्म केल्यानंतर मुलींना सोडून दिले जात नाही. त्यांना काम आणि रोजी-रोटी मिळते.
- सरोज खान येथेच थांबल्या नाहीत. त्यांनी सरकारी कर्मचा-यांवरही निशाना साधलाय. अनेक सरकारी लोक मुलींवर हात साफ करुन घेतात. असे त्या म्हणाल्या.
- सरोज खानला एका न्यूज चॅनलच्या शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा सरोज खान यांनी असे वक्तव्य केले.


सोशल मीडियमध्ये साधला जातोय निशाना
- सरोज खान व्दारे कास्टिंग काउचवर केलेल्या व्यक्तव्यावर लोक सोशल मीडियावर नाजारी व्यक्त करत आहेत.
- एका यूजरने लिहिले, "अशिक्षित महिलेकडून कसे उत्तर असेल?"
- तर एका यूजरने लिहिले की, 'जिथून आपण शिकतो, पाहा तिथले लोक काय विचार करतात.'
- तर एका यूजरने लिहिले की, 'काही लोक रोज नवे तर्क लावतात, रेप का योग्य आहे?'
- तर सरोज खानच्या एका फॅनने लिहिले की, 'मी तुमचा फॅन आहे, माझ्या मनात तुमच्यासाठी खुप सन्मान आहे. परंतू हे व्यक्तव्य लाजिरवाने आहे.'


2 हजारपेक्षा जास्त गाणे केले आहे कोरियोग्राफ
- 2000 पेक्षा जास्त गाणे सरोज खान यांनी कोरियोग्राफ केले आहेत. त्यांचा जन्म 22 नोब्हेंबर 1948 मध्ये झाला होता.
- किशनचंद सध्दू आणि नोनी सध्दू सिंहच्या घरी जन्मलेल्या सरोजचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधू सिंह नागपाल आहे.
- पार्टीशननंतर सरोज खानचे कुटूंब पाकिस्तानातून भारतात आले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी त्यांना चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'नजराना' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

 

वयाच्या 13 वर्षी झाले होते सरोज खानचे लग्न
- सरोज खानने वयाच्या 13 व्यावर्षी इस्लाम धर्म स्विकारुन 43 वर्षांचे डान्स मास्टर बी सोहनलालसोबत लग्न केले होते. ते सरोज खानपेक्षा जवळपास 30 वर्षांनी मोठे होते. हे त्यांचे दूसरे लग्न होते. पहिल्या लग्नापासून त्यांना 4 मुलं होते.


- एका मुलाखतीत सरोज खान यांनी सांगितले होते की, वयाच्या 13 वर्षी मी शाळेत जायचे, मला लग्नाचे मायने माहिती नव्हते. एकदा त्यांचे डान्स मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या लग्नात काळा दोरा बांधला. असे केल्यावर सरोजला वाटले की, त्यांचे लग्न झाले आहे.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...