आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच दिलीप कुमार यांना सोडून लग्नात गेल्या सायरा, आठवणीने झाल्या बेचैन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती ट्वीटद्वारे केली आहे. 29 जूनला सायरा एखा लग्नाला गेल्या होत्या. दिलीप कुमार यांच्याशी लग्नानंतर प्रथमच सायरा बानो दिलीप कुमार यांच्याशिवाय एखाद्या कार्यक्रमात आल्या होत्या. पण याठिकाणीही त्या पती दिलीप यांना मिस करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी स्वतः ट्वीटरवर तशी कबुली दिली. 


ट्वीट केले प्रार्थना करा
सायरा यांनी ट्वीट केले, तुमच्यावर देवाची कृपा कायम राहो. माझ्या कोहिनूरच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करा. सायरा यांनी दिलीप यांच्या ट्वीटरवर एक फोटोही शेअर केला आहे. त्यात कॅप्शन लिहिले आहे, निदा फारुखी के निकाह में.. लेकिन वह फोटो में नहीं हैं.. 

 

गेल्या वर्षी बिघडली होती तब्येत 
94 वर्षीय दिलीप कुमार यांना 2 ऑगस्ट 2017 मध्ये डिहायड्रेशन आणि युरीन इन्फेक्शनमुळे आठवडाभरासाठी लिलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. ते घरी परतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली होती. 

 

22 साल वर्षांनी लहान आहेत सायरा 
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडच्या आयकॉनिक लव्ह स्टोरीपैकी एक आहे. सायरा यांच्या जिद्दीमुळेच दिलीप कुमार त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान सायरा यांच्याशी लग्न करण्यासाठी तयार झाल्या होत्या. 1966 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. दिलीप कुमार यांनी 1981 मध्ये हैदराबाहेत असमा यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पण 1983 मध्ये त्यांचा तलाक झाला. 

बातम्या आणखी आहेत...