आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहानाने केले शाहरुखला Kiss, सोशल मीडिया यूझर्स म्हणाले हा असा कसा बाप-लेकीचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहरुख खान सद्या स्पेनच्या बार्सिलोनामध्ये फॅमिलीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या व्हॅकेशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शाहरुखची 18 वर्षांची मुलगी सुहाना वडील शाहरुखला गालावर Kiss करताना दिसत आहे. या फोटोवरून सोशल मीडिया यूझर्समध्ये चांगलाच वाद होत आहे. अनेक यूझर्स या मुद्द्यावरून शाहरूख आणि सुहानाला ट्रोल करत आहेत. 


ट्रोलर्स म्हणाले-बाप लेकीचा असा कसा फोटो  
शाहरुखने हा फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरीवर Sun Kissed कॅप्शनसह शेअर केला आहे. फोटोवर ट्रोलर्स आक्षेपार्ह कमेंट्स करत आहेत. अनेक यूझर्सने तर बाप लेकीचा हा कसा फोटो आहे, असा सवालही केला. इंडियन्सना काय झाले आहे? फॉरेनर्ससारखे कूल दिसण्यासाठी आपण संस्कृती विसरत आहोत.. अशा कमेंट्स फोटोवर येत आहेत. 


कौतुकही झाले 
शाहरुख आणि सुहानाचे कौतुक करणाऱ्याही अनेक कमेंट्स येत आहेत. एका सोशल मीडिया यूझरने ट्रोलर्सना प्रत्युत्तर देत लिहिले की, मी अनेक कमेंट्स वाचतोय. फक्त मुलीने बापाला किस केले म्हणून फोटोला वाईट म्हणत आहात. दुसऱ्या एका यूझरने कमेंट केले की, साधा सरळ फोटो आहे. तुमच्या घाणेरड्या विचारांनी त्याला भलताच रंग चढला. फोटोमध्ये काहीही वाईट नाही. 


आमीरही झाला होता ट्रोल 
काही महिन्यांपूर्वीच आमीर खानने मुलगी इरा बरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यात दोघांचे चांगले बाँडिंग दिसत होते. पण सोशल मीडिया यूझर्सने त्यावर वाईट प्रकारे ट्रोलिंग केले होते. रमजानच्या महिन्यात तरी मुलीला चांगले कपडे घालायला सांगा असे ट्रोलर्सने आमीरला सुनावले होते.