आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - 'पद्मावती'मध्ये राजा रतन सिंहचा रोल करणारा शाहिद कपूर जयपूरमधील बीलवा येथे आयोजित राधा स्वामी सत्संग समारोहात सहभागी होण्यासाठी आला होता. यावेळी गुपचूप जयपूरमध्ये आलेला शाहिद कपूर जेव्हा मुंबईला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याने तोंडावर मास्क लावला होता. विमानतळावर मीडिया फोटोग्राफरने त्याचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षरक्षकांनी त्यांना विरोध केला. फोटोग्राफर्सचे कॅमेरे तोडण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी विमानतळावरील सुरक्षारक्षक बघ्याच्या भूमिकेत होते.
काय आहे प्रकरण...
- जयपूर येथून मुंबईला परत जाताना विमानतळावर शाहिद सोबत त्याची संपूर्ण फॅमिली होती. शाहिदने त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. त्याच्यासोबत पत्नी मीरा आणि मुलगी मीशा होती.
- बीलवा येथून जयपूर विमानतळापर्यंत शाहिदला कुठेही त्रास झाला नाही. शाहिद शिवाय त्याच्या फॅमिलीतील इतर कोणीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला नव्हता.
- शाहिदसोबत दिल्ली पोलिसांचे जवान त्याला एस्कॉर्ट करताना दिसले.
- पद्मावतीला राजस्थानमध्ये होत असलेल्याविरोधामुळे शाहिदने दक्षता बाळगली होती. या फिल्ममध्ये शाहिद राजा रतनसिंहच्या भूमिकेत आहे.
- शाहिद सोबत पत्नी, मुलगी यांच्यासह आई सुप्रिया पाठक, वडील पंकज कपूर देखील होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.