आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor To Play A Boxer In Airlift Director Raja Krishna Menon's Next Film

Bollywood Update:शाहिद कपूरच्या कल्पनेवर तयार होणार बॉक्सिंगवर आधारित चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेता शाहिद कपूर गेल्या 15 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता त्याचा एक नवीन क्रिएटिव्ह पैलू समोर आला आहे. तो डायरेक्टरर्सला एका लेखकाप्रमाणे इंस्पायरिंग स्टोरीजचे वन लायनर देत आहेत. बॉक्सिंगवर आधारीत असाच एक वन लायनर त्याने 'एयरलिफ्ट' फेम डायरेक्टर राजा कृष्ण मेननला ऐकवला होता. ही कथा राजाला पसंत पडली आणि आता दोघं मिळून यावर चित्रपट बनवणार आहेत.

 

डिसेंबरमध्ये सुरु होणार शूटिंग
राजाने याविषयी सांगितले की, 'आम्ही यावर्षी डिसेंबरपर्यंत या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहोत. शाहिदने याची आयडिया मला वर्षाच्या सुरुवातीलाच दिली होती. ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आपल्याकडे स्पोर्ट्सवर कमी चित्रपट तयार होतात. चित्रपट तयार झाले तरीही ते स्पेशली क्रिकेट आणि हॉकीवर आधारित असतात.
बॉलिवूडमध्ये बॉक्सिंगवर आतापर्यंत 'मेरीकॉम' आणि 'साला खडूस'सारखे चित्रपट बनले आहे. 'मेरीकॉम' हा चित्रपट हिट ठरला होता. परंतू तरीही लोकांनी बॉक्सिंगवर कोणतेही चित्रपट अटेंम्प्ट केले नाही. आता शाहिदला या स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट करण्याची इच्छा आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मला 'उडता पंजाब'मध्ये शाहिदचा अभिनय चांगला वाटला होता आणि त्याला माझा 'एयरलिफ्ट' खुप पसंत आहे.

चित्रपटाविषयी राजा यांनी सांगितले की, 'सध्या आम्ही चित्रपटाचे रिसर्च वर्क करत आहोत. ऑगस्टमध्ये आम्ही हरियाणा भिवानीच्या भागात जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही पाहणार आहोत की, घरोघरो बॉक्सिंगने लोकांचे विचार बदलले आहेत का. विशेषतः फीमेल बॉक्सर्ससमोर आल्यानंतर पुरुषप्रधान समाजाचे विचार आणि अप्रोचमध्ये काय बदल आले आहेत. हा पैलू आम्ही चित्रपटात दाखवणार आहोत.'

 

हा चित्रपट बायोपिक नसणार
शाहिद या चित्रपटासाठी खुप एक्सायटेड आहे. हा बायोपिक नाही फिक्शनल फिल्म असेल. या चित्रपटासाठी सध्या शाहिदला लॉक करण्यात आले आहे. इतर कलाकारांची कास्टिंग नंतर सुरु  होईल. काही स्टूडियोजनेही या चित्रपटामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. सध्या शाहिद हा 'बत्ती गुल मीटर चालू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याची शूटिंग पुर्ण झाल्यानंतर तो या चित्रपटावर काम करणे सुरु करेल.

 

 

बातम्या आणखी आहेत...