आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRKचा मुलीला इमोशनल मेसेज, म्हणाला - 'तू उंच झेप घेण्यासाठी जन्माला आली आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान 22 मे रोजी 18 वर्षांची झाली. यानिमित्ताने शाहरुखने इंस्टाग्रामवर अनोख्या अंदाजात सुहानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सुहाना उडताना दिसतेय. शाहरुखने सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, 'मला ठाऊक आहे, की प्रत्येक मुलीप्रमाणे तुझा जन्म उंच झेप घेण्यासाठी झाला आहे. आता तू कायदेशीररित्या ती प्रत्येक गोष्ट करु शकते, जी तू 16 व्या वर्षीपासून करतेय. लव्ह यू...' शाहरुखच्या या पोस्टला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शाहरुख आपल्या लेकीविषयी जास्तच प्रोटेक्टिव आहे. 


शाहरुखने सुहानाला दिले आहे स्वातंत्र्य... 
शाहरुखची इच्छा आहे, की सुहानाने तिला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावाे. सुहानाला स्पोर्ट्स आणि अभिनयात रुची आहे. एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता, की मी अभिनेता आहे, म्हणून माझ्या मुलांनीही याच क्षेत्रात काम करावे, असे माझे मत नाही. त्यांना हवं ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण सुहाना एक चांगली अभिनेत्री असल्याचेही शाहरुख म्हणाला होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, सुहानाचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...