आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असे दिसतात 95 वर्षीय दिलीप कुमार, तब्येतीच्या चौकशीसाठी पोहोचला शाहरुख खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतकाळातील अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत दिर्घकाळापासून खालावली आहे. 95 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी शाहरुख खान त्यांच्या घरी पोहोचला. शाहरुखने त्यांची विचारपुस केली आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवला. या दोघांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. यामध्ये दीलीप कुमार यांना ओळखणेही कठीण झाले आहे. ट्विटरवर दिली माहिती...


या दोघांच्या भेटीची माहिती दिलीप कुमार यांनी ट्विटरवर फोटो टाकून दिली. यावर त्यांनी कॅप्शन लिहिले की, '@iamsrk came to visit Saab at home today. -FF'. या फोटोमध्ये शाहरुख खानने दिलीप यांचा हात पकडलेला आहे. फोटोमध्ये दिलीप कुमारची परिस्थिती खुप नाजुक दिसतेय. दिलीप कुमार शाहरुखला मुलगा मानतात. शाहरुखही दिलीप कुमार यांना नेहमीच भेटायला जातो आणि मुलगा असल्याचे कर्तव्य पार पाडतो. सध्या शाहरुख 'झीरो' चित्रपटाची शूटिंग करत आहे. यामध्ये शाहरुख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आनंदर एल रायच्या या चित्रपटात कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...