आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 वर्षांच्या शाहरुखने सांगितले आपल्या फिटनेसचे रहस्य, या कारणामुळे गौरीसोबत केले लवकर लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शाहरुख खान आपला आगामी चित्रपट 'झिरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून तो आपल्या सोशल मीडिया फॅन्सला वेळ देत आहे. त्यांनी फॅन्ससोबत बोलण्यासाठी ट्विटरवर #AskSRK हॅशटॅग सुरु केला आहे. यामध्ये तो आपल्या सर्व फॅन्सच्या प्रश्नांचे उत्तर देत आहे. त्याच्या अनेक फॅन्सने त्याला गौरी आणि मुलगा अबरामविषयी अनेक प्रश्न केले. शाहरुखने या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

 

शाहरुख आणि फॅन्सचा संवाद


1. तुम्ही एवढ्या लवकर लग्न का केले?
- प्रेम आणि लक आयुष्यात कधीही येतात. माझ्या आयुष्यात ते गौरीसोबत लवकरच आले.


2. तुमच्यासोबत सर्वात चांगले काय घडले आहे?
- अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या इथे सांगता येणार नाही... आयुष्य चांगले आहे.

 

3. तुम्ही अजुनही एवढे फिट कसे?
- मी स्मोकिंग करत नाही. दिवसातील 10 तास झोपतो आणि कधीच खोटे बोलत नाही.


4. सलमान खानला एका शब्दात का म्हणाल?
- BRO


5. तुमचे वय काय आहे?
- विकिपीडिया चेक करुन घ्या.


6. तुम्ही किती वेळा आजारी पडतात?
- Really?? आता तुम्ही हेसुध्दा विचाराल का?  Wow.

 

7. तुम्हीच आहात का?
- चेक करण्यासाठी मला पिंच करु शकता. हो हा मीच आहे.

 

6. जूनला सुरु केला होता हॅशटॅग
शाहरुखने 6 जून, 2018 ला ट्वीटवर मॅसेज लिहिला होता की, तो कामात खुप व्यस्त आहे यामुळे फॅन्ससोबत दिर्घकाळापासून चॅट करु शकत नाहीये. तुम्ही आता माझ्यासोबत बोलण्यासाठी #AskSRK वापर करु शकता. या हॅशटॅगचा वापर करणा-या सर्व फॅन्सच्या प्रश्नांची उत्तर तो देत आहेत. म्हणजेच तुम्हाला शाहरुखला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही ट्विटरवर #AskSRK चा वापर करु शकता.


'झिरो'चा टीजर चाहत्यांना पसंत
13 जून, 2018ला 'झीरो"चा टीजर यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत हा टिजर 30 मिलियन म्हणजेच 3 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला आहे. 5 लाखांपेक्षा जास्त फॅन्सने हा टीजर लाइक केला आहे. यामध्ये शाहरुख आणि सलमान खानची डान्स बॉन्डिंग दिसतेय. चित्रपटात शाहरुख खान ठेंगणा दिसणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...