आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Instagram Debut: 65 व्या वर्षी शक्ती कपूर इंस्टाग्रामवर, फॅन्स म्हणाले - वेलकम क्राइम मास्टर गोगो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 80 च्या दशकातील हिट कॉमेडियन आणि व्हिलेन शक्ती कपूर (65) फायनली इंस्टाग्रामवर आले आहेत. शक्तीने इंस्टाग्रामवर पहिला फोटो हा पत्नी शिवांगीसोबतचा शेअर केला आहे. सध्या शक्ती कपूर हे पत्नी आणि मुलीसोबत विदेशात हॉडिले एन्जॉय करत आहेत. शक्तीने या हॉलिडेचे फोटोज शेअर केले आहे. इंस्टावर येताच फॅन्सने शक्ती कपूर यांना त्यांच्या अंदाजात वेलकम केले. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "वेलकम क्राइम मास्टर गोगो" तर दूस-याने लिहिले की, "धक-की-टिक्की, धक-की-टिक्की, धक-की-टिक्की... धक... वेलकम क्राइम मास्टर गोगो..." एकाने लिहिले की, "मोगॅम्बो का भतीजा" अशा प्रकारे लोकांनी त्यांचे स्वागत गेले.

 

पळून जाऊन केले होते लग्न
- शक्तीने हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री राहिलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांची मोठी बहिण शिवांगीसोबत लग्न केले आहे. त्या 80 च्या दशकातील अभिनेत्री होत्या.
- शिवांगीने 1980 मध्ये 'किस्मत' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्या मिथुन चक्रवर्ती आणि रंजीता प्रमुख भूमिकेत होते.
- या चित्रपटात शक्ती कपूरनेही काम केले होते. दोघांची पहिली भेट या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 

 

मैत्रीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- शिवांगीचे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते. शेवटी दोघांनी 1982 मध्ये पळून जाऊन लग्न केले.
- शिवांगीने लग्न केले तेव्हा तिचे वय फक्त 18 वर्षे होते. लग्नानंतर त्यांनी काम करणे बंद केले आणि वैवाहिक आयुष्यात व्यस्त झाल्या.
- दोघांना मुलगी श्रध्दा कपूर आणि मुलगा सिध्दांत कपूर आहेत. श्रध्दा बॉलीवूड अभिनेत्री आहे. तर सिध्दांतनेही 'शूटआउट एट वडाला' मधून बॉलिवूड एंट्री केली आहे. 

 

सुनील दत्तने दिला होता ब्रेक
- शक्ती कपूरला सर्वात पहिले सुनील दत्तने 'रॉकी' चित्रपटात व्हिलेनचा रोल ऑफर केला होता. यापुर्वी त्यांनी अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या. परंतू रॉकी चित्रपटातून त्यांना यश मिळाले.
- 'रॉकी' नंतर 'कुर्बानी', 'हिम्मतवाला' आणि सुभाष घईच्या चित्रपटात शक्ती हे व्हिलेनच्या भूमिकांमध्ये दिसले. चार ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर ते इंडस्ट्रीचे व्हिलेन बनले.
- 90 च्या दशकात शक्ती कपूरने कॉमिक भूमिका करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये आलेल्या 'राजा बाबू' चित्रपटात त्यांनी साकारलेल्या नंदू या भूमिकेला फिल्म फेअर बेस्ट कॉमेडिअनचा अवॉर्डही मिळाला होता.
- 'इंसाफ', 'बाप नंबरी बेटा 10 नंबरी', 'अंदाज अपना अपना', 'तोहफा', 'चालबाज', 'बोल राधा बोल' यांसारख्या चित्रपटात त्यांनी कॉमिक रोल केले.

 

केले आहेत 400 पेक्षा जास्त चित्रपट 
- शक्ती कपूरने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 400 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. एकेकाळी शक्ती कपूर आणि कादर खानची जोडी कोणताही चित्रपट हिट करण्यासाठी पुरेसी असायची. काही दिवसांपुर्वीच शक्ती यांनी दुःख व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, आजकाल हिरोच व्हिलेनचे काम करत आहेत आणि व्हिलेन आउट होत आहेत.
शक्ती कपूर यांनी  'कुर्बानी'(1980), 'नसीब' (1981), 'रॉकी' (1981), 'वारदात' (1981), 'सत्ते पे सत्ता' (1982), 'हीरो' (1983), 'जानी दोस्त' (1983), 'मकसद' (1984), 'करिश्मा कूदरत का' (1985), 'कर्मा' (1986), 'गुरु' (1989) सोबतच अनेक चित्रपटात काम केले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शक्ती कपूरच्या इंस्टाग्राम डेब्यूवर येत असलेल्या सोशल मीडिया कमेंट्स...

 

 

बातम्या आणखी आहेत...