आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शम्मी आंटीच्या प्रेअर मीटमध्ये सासूबाईंसोबत पोहोचली ऐश्वर्या, या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 6 मार्च रोजी बॉलिवूड अभिनेत्री शम्मी आंटी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. दीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. गुरुवारी मुंबईइतील इस्कॉन टेम्पलमध्ये त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शम्मी आंटी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बच्चन कुटुंबातून ऐश्वर्या राय तिच्या सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत पोहोचली होती. याशिवाय डिंपल कपाडिया, आशा पारेख, अरुणा इराणी, फरीदा जलाल, अंजू महेंदू, मुकेश ऋषी, प्रेम चोप्रा, उमा चोप्रा, पद्मिनी कोल्हापुरे, प्रिया दत्त, गजेंद्र चौहान, पूनम सिन्हासह अनेक कलाकार पोहोचले होते. 


मंगळवारी झाले होते शम्मी आंटींवर अंत्यसंस्कार...
- मंगळवारी लोखंडवाला येथील शम्मी यांच्या घरातून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली होती.
- यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फरीदा जलाल, इमरान खान, सुशांत सिंह, फराह खान, बोमन इराणी, प्रिया दत्त, मिहिर विज सह अनेक कलाकार पोहोचले होते.


शम्मी यांनी या चित्रपटांमध्ये केले काम...
- शम्मी यांनी 'इल्जाम' (1954), 'पहली झलक' (1955), 'बंदिश' (1955), 'आजाद' (1955), 'घर संसार' (1958), 'कुली नंबर 1' (1991), 'हम' (1991), 'मर्दो वाली बात' (1998), 'गुरुदेव' (1990), 'गोपी किशन' (1994), 'हम साथ-साथ है' (1999) सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  2013 मध्ये रिलीज झालेला 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे.
- अभिनेत्री आशा पारेख आणि शम्मी या जीवलग मैत्रिणी होत्या. अखेरच्या काळात आशा पारेख शम्मी यांचा सांभाळ करत होत्या. वहिदा रहमान आणि नर्गिस दत्त यांच्यासोबतही शम्मी यांची घनिष्ठ मैत्री होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, शम्मी आंटी यांच्या शोकसभेत पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...