आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशुतोषच्या या चित्रपटातून घडणार इतिहासाचं दर्शन, \'पानिपत\'साठी बांधला जातोय शनिवारवाडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासावर प्रकाश टाकला जातो. आशुतोष गोवारिकर हे मोठ्या पडद्यावर इतिहास दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. आशुतोष गोवारिकर लवकरच 'पानिपत' चा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक चित्रपट घेऊन येत आहेत. 'पानिपत- द ग्रेट ब्रेट्रेयल' असे या चित्रपटाचे नाव आहे.  त्यासाठी आता जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू आहे.

 

तरण आदर्श यांनी शेअर केला फोटो

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंदभात एके फोटो शेअर केला आहे. भूमिपूजनाचे फोटो पोस्ट करत त्यांनी या चित्रपटाविषयी माहिती दिली. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत शनिवाड्याची प्रतिकृती उभारली जाणार आहे. आशुतोष गोवारिकर यांच्या हस्ते येथील भूमिपूजन करण्यात आले. 

 

काही दिवसांपुर्वीच केली होती घोषणा
आशुतोष गोवारिकर यांनी काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात घोषणा केली होती. यासोबतच चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित केले होते. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. बिग बजेट प्रोजेक्ट असणाऱ्या 'पानिपत'चं महत्त्वं पाहता चित्रीकरणासाठी आता संपूर्ण टीमसह खुद्द आशुतोषही तयारीला लागला आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तरण आदर्श यांनी केलेलं ट्वीट आणि फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...