आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीला वाढदिवशी 6 वर्षाच्या मुलाने दिले हँडमेड गिफ्ट, होस्ट केली सरप्राइज पार्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 8 जून 1975 मध्ये बेंगलुरु, कर्नाटकमध्ये जन्मलेली शिल्पा शेट्टी 43 वर्षांची झाली आहे. शिल्पाच्या या वाढदिवशी तिचे पती राज कुंद्रा आणि मुलगा विआनने शिल्पासाठी एक सरप्राइज पार्टी होस्ट केली होती. दोघांनी मिळून बेडरुम सजवली. एवढेच नाही तर 6 वर्षांच्या विआनने आईसाठी एक बर्थडे गिफ्ट तयार केले. हे गिफ्ट खुप क्यूट आहे. यावर विआनने "I love you mom, happy birthday" असे लिहिले आहे. पती राजने पत्नीच्या वाढदिवशी रामँटिक अनसीन पिक्चर्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत केले होते लग्न
शिल्पाने 22 नोव्हेंबर, 2009 ला लंडन येथील बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले होते. दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. लंडनमध्ये शिल्पा बिग ब्रदर(2007) हा रिअॅलिटी शो जिंकून प्रसिध्द झाली, तर राज कुंद्रा तिथे आपल्या बिझनेसच्या दुनियेत प्रसिध्द होते. शिल्पा परफ्यूम ब्रांड एस-2 चे प्रमोशन करत असताना दोघांची भेट झाली. राजने शिल्पाचा परफ्यूम ब्रांड प्रमोट करण्यात मदत केली. यावेळी दोघांनी डेटिंग करणे सुरु केले आणि 2009 मध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. त्यांना आता विआन नावाचा एक मुलगा आहे. हे शिल्पाचे पहिले लग्न आहे तर राजचे दूसरे लग्न आहे.  राजने पहिले लग्न (2003) मध्ये कवितासोबत केले होते.

 

जवळपास 40 चित्रपटांमध्ये केले काम
शिल्पाने हिंदू, तामिळ, तेलुगु आणि कन्नड अशा जवळपास 40 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 1993 मध्ये आलेल्या शाहरुख खान आणि काजोल स्टारर चित्रपट 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ती 'आग' (1994) या चित्रपटातून पहिल्यांदा लीड रोलमध्ये दिसली.  'धड़कन' (2000), 'रिश्ते' (2002) आणि 'फिर मिलेंगे' (2004) सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांची खुप प्रशंसा करण्यात आली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यानचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...