आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची चाळिशीनंतर अमिताभ कन्या श्वेताचा अभिनयात Debut, लहान वयातच थाटले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा सोशल मीडीयावर अॅक्टीव्ह झाली आहे. केवळ सोशल मीडियाच नाही तर अऩेक बॉलिवूड पार्टीतही श्वेता हजेरी लावताना दिसते आहे. यामागचे कारणही आता समोर आले आहे. श्वेता बच्चन नंदा लवकरच अॅक्टींग डेब्यु करणार आहे आणि तेसुद्धा वडील अमिताभ   बच्चन यांच्यासोबत. श्वेता एका ज्वेलरीच्या अॅडमध्ये काम करत आहे.

 

या जाहिरातीत वडील-मुलीचे प्रेम आणि विश्वासाची एक सुंदर कथा दाखविण्यात आली आहे. श्वेताला वयाच्या 44व्या वर्षी अॅक्टींग करण्याचा चान्स मिळाला आहे. अमिताभ बच्चन वडील असूनही श्वेताने कधीच चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. 

 

अमिताभ-जया यांच्यासारख्या स्टारच्या पोटी जन्म घेऊनसुद्धा श्वेता बच्चनने कधीच चित्रपटांतस काम न करण्याचे ठरविले होते. इतकेच नव्हे तर लग्नाअगोदर आणि नंतरही श्वेताने काम केले नव्हते. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, 23व्या वर्षीच दिला मुलीला जन्म...

बातम्या आणखी आहेत...