आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddhanth Kapoor Who Was In The UAE With Sridevi Opens Up About Her Shocking Sad Demise

श्रीदेवीला हृदयविकाराचा त्रास नव्हता, कपूर कुटुंबियांसाठी धक्का पचवणे अवघड: संजय कपूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- श्रीदेवी यांना ह्दयविकाराचा त्रास जाणवत नव्हता. श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे, असे बोनी कपूर यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता संजय कपूर यांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत शेवटच्या काही तासात काय घडले याची माहिती अभिनेते शक्ती कपूर यांचे पुत्र सिध्दांत कपूर यांनी 'दिव्य मराठी'ला दिली आहे. दरम्यान श्रीदेवी यांना चक्कर आल्याने बाथरुममध्ये पडल्या होत्या अशी बाबही समोर आली आहे. 

 


मोहित मारवाह यांच्या विवाह समारंभात श्रीदेवी यांचे आरोग्य उत्तम असल्याचेच वाटत होते. या समारंभास श्रीदेवी या पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी सोबत उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने अनेकांना धक्का बसला. रात्री अकराच्या सुमारास श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. असे काही घडेल असे कुणालाही वाटले नव्हते.

हा एक मोठा समारंभ होता. त्यांनी संगीत आणि मिरवणूकीतही भाग घेतला. त्या अतिशय व्यवस्थित या समारंभात वावरत होत्या. हा समारंभास संपल्यावर मी लगेच गोव्यात काम असल्याने परतलो. या लग्नानंतर कपूर कुटूंब दुबईतच काही काळ घालवणार होते. बोनी कपूर हे यावेळी अनेकांना फिटनेसच्या टिप्सही देत होते, असे हसिना पारकर यांनी सांगितले.

 

अर्जुन कपूर याची बहिण अंशुला कपूर ही आपल्या संपर्कात असल्याचे सिध्दांतने सांगितले. अर्जुन हा अमृतसर येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला असल्याचे सांगण्यात आले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...