आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिध्दार्थ मल्होत्रा 31 वर्षांचा झाला आहे. 16 जानेवारी 1985ला त्याचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला. 2012मध्ये त्याने करन जोहरच्या 'स्टुडेंट ऑप द ईअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 'हंसी तो फंसी', 'एक व्हिलेन' आणि 'ब्रदर्स' 'बार बार देखो', 'ए जेंटलमेन' या फिल्ममध्ये त्याने काम केलेय.
वयाच्या 18व्या वर्षी सुरु केली मॉडेलिंगला सुरुवात...
सिध्दार्थने वयाच्या 18व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मात्र चार वर्षांनंतर त्याने प्रोफेशन सोडले. कारण तो यात समाधानी नव्हता. 'स्टुडेंट ऑफ द ईअर'पूर्वी त्याने अनुभव सिन्हाच्या एका सिनेमाचे ऑडिशन दिले होते. परंतु तो सिनेमा अडकला. 2010मध्ये त्याने करन जोहरच्या 'माय नेम इज खान' सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
वडील करत होते इंडियन मर्चेंट नेव्हीमध्ये काम आणि आई होती होममेकर...
सिध्दार्थ मल्होत्राचे वडील सुनील इंडियन मर्चेंट नेव्हीमध्ये काम करत होते. सिध्दार्थची आई रिमी होममेकर आहे. त्याने दिल्लीच्या डॉन बोस्को शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून शहीद भगत सिंह कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले.
पुढील स्लाड्सवर क्लिक करून पाहा सिध्दार्थच्या आयुष्यातील काही फोटो...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.