आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक अंकित तिवारी पल्लवीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत, बघा लग्नाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कानपुरः गायक आणि संगीतकार अंकित तिवारी शुक्रवारी रात्री पल्लवी शुक्लासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. पल्लवी एक मॅकेनिकल इंजिनिअर असून दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे. शुक्रवारी रात्री कानपूरच्या हॉटेल लँडमार्क येथे दोघांचा लग्नसोहळा पार पडला. याच महिन्यात म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी अंकित आणि पल्लवीचा साखरपुडा झाला होता. आता येत्या 26 फेब्रुवारी रोजी मुंबईत त्यांचे वेडिंग रिसेप्शन होणार आहे.


मुळचा कानपूरचा आहे अंकित... 

- अंकित मुळचा उत्तर प्रदेशातील कानपूरचा आहे. येथील काकादेवच्या रानी गंज मोहल्ल्यात त्याचे घर आहे.

- पल्लवी शुक्ला बंगळूरुत मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. येथे ती तिच्या आई आणि भावासोबत वास्तव्याला आहे. लग्नानंतर पल्लवी न्युझिलंड येथे मास्टर्स डिग्रीच्या शिक्षणासाठी जाणार आहे. 
 अंकिताच्या आजीला ट्रेनमध्ये गवसली सून
- मीडि‍या रि‍पोर्ट्सनुसार, अंकितची आजी (वडिलांची आई) रामकुमारी तिवारी यांची एका प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये पल्लवी शुक्लासोबत भेट झाली होती. यावेळी तिच्याशी गप्पा मारताना आजीला पल्लवी भावली आणि त्यांनी पल्लवीच्या कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. गोष्ट पुढे सरकली आणि अंकित-पल्लवीचे लग्न ठरले. 
- एका मुलाखतीत अंकि‍तने सांगितले होते, की पल्लवी आपल्या घराण्याची सून होणार असल्याचे आजीने घरी सांगितले आणि सगळे या लग्नासाठी तयार झाले. पल्लवी सगळ्यांना पसंत पडली याचा मला आनंद वाटतो. पल्लवी एक अतिशय साधी मुलगी आहे. आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी 10 जण आमच्यासोबत होते. 


कोण आहे अंकित तिवारी?
- प्लेबॅक सिंगर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अंकित तिवारी एक संगीतकारदेखील आहे. तो टीव्ही आणि बॉलिवूडसाठी काम करतो. 
- 'आशिकी 2' या चित्रपटातील 'सुन रहा है ना तू' आणि 'एक विलेन' या चित्रपटातील 'तेरी गलियां' या गाण्यांनी अंकितला लोकप्रियता मिळवून दिली. 
- अंकितच्या वडिलांचा म्युझिक ग्रुप असून आई भक्तीगीत गाते. अंकित दररोज 12 तास रियाज करतो. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अंकित-पल्लवीच्या लग्नाचे निवडक Photos... 

बातम्या आणखी आहेत...