आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाची चूक काढणा-या अमिताभ यांनी स्वतःच केली चुक, मागितली माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहतात. याच वेळी अमिताभ यांनी आपल्या एका चित्रपटाची माहिती चाहत्यांना देण्यासाठी ट्वीट केले. परंतू यामध्ये थोडी चूक झाली. या चुकीची नंतर त्यांनी माफीही मागितली.


असे आहे पुर्ण प्रकरण
9 जून रोजी अमिताभ यांनी ट्वीट करत लिहिले की, - 37 वर्षे, काला पत्थर. या चित्रपटाच्या काळात मला अनेक अनुभव आले. जेव्हा मी कोलकत्याच्या कोळशाच्या खानीत काम केले होते. यानंतर राहुल सेन ईएफ नावाच्या ट्वीटर हँडलवरुन एका यूजरने अमिताभ यांना त्यांची चूक सांगितली. या व्यक्तीने लिहिले - सर मला वाटते की, हे टायपिंग एरर आहे, ते 39 वर्षे आहे. यानंतर अमिताभ यांनी आपली चुक मान्य करत लिहिले की, करेक्शन, काला पत्थरला 39 वर्षे झाले आहेत. माफी असावी.

 

बिग बींनी आलियाला करुन दिली होती चुकीची जाणिव
आलिया भट सध्या अमिताभ बच्चन आणि रणवीर कपूरसोबत डायरेक्टर अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची शूटिंग करत आहे. बिग बीसोबत शूटिंगचा अनुभव शेअर करण्यासाठी आलियाने एक ट्वीट केले. परंतू त्यामध्ये एक चुक राहिली. अमिताभ बच्चन यांनी ती चुक पकडली, यासोबतच त्या ट्वीटचा रिप्लाय करुन तिला चुकीची जाणिव करुन दिली होती.


आलियाने काय लिहिले
- आलियाने ट्वीट करुन लिहिले होते की, "Working with AB has been supreme greatness! Today @SrBachchan packed up an hour before the actual pack up but he stayed back on set just to give ques! I can’t begin to explain the amount of things I am learning on set just by watching him!!!!(अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे खुप मोठी गोष्ट आहे. आज अॅक्चुअल पॅकअपच्या एक तासापुर्वी अमिताभ यांनी आपले पॅकअप केले होते. परंतू आमच्यासाठी ते एक तास बसून राहिले. त्यांना पाहून मी काय काय शिकते हे तुम्ही समजावू शकत नाही.)

 

असा होता बिग बींचा रिप्लाय
- आलियाच्या ट्वीटवर बिग बीने लगेच रिप्लाय दिला. ते म्हणाले "Yo .. Alia , you are the best .. thank you for the generosity .. and .. err .. its 'cues' not 'ques' .. .. you are just tooooo cute !!" (यो आलिया तु खुप चांगली आहेस. उदारतेसाठी धन्यवाद आणि एक चुक आहे... ते Cues असते Ques नाही.)

 

आलिया म्हणाली - अरे देवा... यानंतर नाही
- अमिताभने आलियाला तिच्या चुकीची जाणिव करुन दिली तेव्हा तिने रिप्लाय दिला, अरे देवा...यानंतर नाही..." यापुर्वीही आलियाच्या चुका आणि सामान्य ज्ञानामुळे तिची खिल्ली उडवली गेली आहे.


दोन मोठ्या चित्रपटात दिसणार अमिताभ 
वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर अमिताभ लवकरच आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' मध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफही काम करत आहे. यासोबतच बिग बी अयान मुखर्जीच्या डायरेक्शनमध्ये तयार होत असणा-या 'ब्रम्हास्त्र' मध्येही दिसणार आहेत. यामध्ये त्यांसोबतच प्रमुख भूमिकेत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आहेत.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ बच्चन यांचे ट्वीट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...