आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bad News: बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला \'हायग्रेड कर्करोग\'; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ‘हायग्रेड कर्करोगा’चे निदान झाले असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. स्वत: सोनालीने सोशल मीडियावर याची माहिती दिली. ‘वैद्यकीय चाचण्यांत मला हायग्रेड कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. असे काही होईल, हे मला कदापिही वाटले नाही. सातत्याने होणाऱ्या वेदनांमुळे मी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हा चक्रावून टाकणारा अहवाल समोर आला,’ असे साेनाली सांगते. 


सोनाली म्हणाली, ‘या क्षणी परिवार आणि मित्र माझ्यासोबत उभे आहेत. मी या सर्वांचे आभार मानते. तत्काळ पावले उचलण्याव्यतिरिक्त या आजाराशी लढण्याचा इतर दुसरा कोणताही चांगला मार्ग असू शकत नाही. मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. त्याबाबत शक्य ती पावले मी उचलत आहे. तुमच्या प्रेम हे माझ्या उपचारांना बळ देत आहे.’

 

मराठी कुटुंबात झाला सोनालीचा जन्म... 
1 जानेवारी 1975ला मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. हा सिनेमा फ्लॉप झाला, परंतु सोनालीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) या सिनेमांचा उल्लेख करावा लागेल.

 

निर्मात्यासोबत थाटला संसार
सोनालीने 2002मध्ये निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले. लग्नानंतर मराठमोळी सोनाली पंजाबी कुटुंबाची सून झाली. 2005मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव रणवीर आहे.

 

11 वर्षांत केले 30 सिनेमे
सोनालीने आपल्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 30 सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. 2003मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर 2013मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले होते.

 

छोट्या पडद्यावर केली एंट्री

कमबॅक केल्यानंतर सोनालीने छोट्या पडद्यावर एंट्री केली. तिने 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' शोमध्ये जजची भूमिका केली. त्यानंतर 'आजीब दास्ता है ये' या डेली सोपमध्येही तिने काम केले होते. विशेष म्हणजे इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' सिझन 3 चीही ती जज आहे. 30 जूनपासून हा कार्यक्रम झी टीव्हीवर सुरु झाला असून ओमंग कुमार आणि विवेक ओबरॉय सोनालीसोबत या शोचे जज आहेत. पण आता पुढचे काही दिवस सोनाली या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार नाही. 


पुढील स्लाईडवर वाचा, सोनालीचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...