आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहे कॅन्सरशी लढा देणा-या मराठमोळ्या सोनाली बेंद्रेचे मुंबईतील आलिशान घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून तिनं स्वत: याचा खुलासा केला. सोनालीला झालेला कॅन्सर 'हायग्रेड' प्रकारातला आहे. हा कॅन्सर शरीरात वेगानं पसरतो.  सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू असून ती लवकरात लवकरात यातून बाहेर पडावी, अशा सदिच्छा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

 

सोनालीने दिग्दर्शकासोबत केलंय लग्न...

90 च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या सोनालीचे लग्न दिग्दर्शक-निर्माता गोल्डी बहलसोबत झाले आहे. गोल्डी आणि सोनाली यांना एक मुलगा आहे.

 

मुंबईत आहे आलिशान घर...

मुंबईतील जुहू या पॉश परिसरात सोनाली आणि गोल्डी बहल यांचे आलिशान घर आहे. विशेष म्हणजे या घराचे इंटेरिअर हृतिक रोशनची एक्स वाइफ आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर सुझान खान हिने केले आहे. सुझान आणि सोनाली जुन्या मैत्रिणी आहेत. याशिवाय सोनालीने तिच्या घरात अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले डेकोरेशन आयटम्स ठेवले आहेत. सोनालीला वाचनाची आवड आहे, त्यामुळे घरात तिने खास बुक शेल्फ तयार करुन घेतले आहे. सोनालीने काही महिन्यांपूर्वी तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना दिसते.

 

बघुयात, मराठमोळ्या सोनालीच्या आलिशान घराची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...