आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरशी लढा देणारी सोनाली एकेकाळी होती TVची सर्वात महागडी अॅक्ट्रेस, न्यूयॉर्कमध्ये सुरु आहेत उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनाली बेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देत असून सध्या न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. आज कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देणारी सोनाली एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 2014मध्ये आलेल्या 'अजीब दास्तां है ये' या मालिकेसाठी सोनाली चार लाख रुपये प्रति एपिसोड मानधन घ्यायची. या मालिकेची निर्माती एकता कपूरच्या मते, सोनालीला मालिकेत घेणे फायद्याचे ठरेल. सोनालीपुर्वी सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रीत अंकिता लोखंडेच्या नावाचा उल्लेख होता. 'पवित्र रिश्ता'साठी तिला 1.15 लाख रुपये प्रति एपिसोड मिळाले होते. 


छोट्या पडद्यावर चालली नाही सोनालीची जादू...  
लाइफ ओके चॅनलवर ऑक्टोबर 2014 मध्ये सुरु झालेली सोनालीची 'अजीब दास्तां है ये' ही मालिका  फक्त 6 महिनेच चालली. मार्च 2015 मध्ये ही मालिका डबाबंद झाली. या मालिकेत सोनालीच्या अपोझिट अपुर्व अग्निहोत्रीने काम केले होते. ही मालिका एक्स्ट्रा  मॅरिटल अफेयरवर आधारित होती. सोनाली आणि अपुर्वसोबत हर्ष छाया मालिकेत मुख्य भूमिकेत होते. 

 

चित्रपटांमध्ये अपयश मिळू लागल्यानंतर थाटले लग्न... 
सोनालीने बॉलिवूडमध्ये 'आग' (1994) या चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. या चित्रपटासाठी तिला न्यू फेस अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये अॅक्टिव होती. सोनालीने टक्कर (1995), दिलजले (1996), तराजू (1997), मेजर साब (1998), हम साथ-साथ हैं (1999), 'सरफरोश' (1999), जिस देश में गंगा रहता है (2000), तेरा मेरा साथ रहे (2001) या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदीसोबतच सोनालीने तामिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला चित्रपटांमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगा असून रणवीर त्याचे नाव आहे. 2005 मध्ये रणवीरचा जन्म झाला.  

 

2013 मध्ये अखेरची मोठ्या पडद्यावर दिसली सोनाली...
सोनालीचा अखेरचा चित्रपट 2013 मध्ये आलेला 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' हा आहे. या चित्रपटात तिने कॅमिओ (छोटा रोल) अपिअरन्स दिला होता. मुमताज खान हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. सोनाली टीव्हीवर जजच्या भूमिकेतही दिसली. जज म्हणून ती 'इंडियन आइडल', 'इंडियाज गॉट टॅलेंट', 'हिन्दुस्तान के हुनरबाज', 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या शोजमध्ये झळकली. 

बातम्या आणखी आहेत...