आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफाननंतर कॅन्सरने ग्रस्त सोनाली दुसरी सेलिब्रिटी, हिंमत वाढवण्यासाठी पुढे आले स्टार्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅलिवूड डेस्कः मार्च 2018 मध्ये अभिनेता इरफान खानने एका ट्वीटच्या माध्यमातून त्याला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सरचे निदान झाल्याचे उघड केले होते. त्याच्या चार महिन्यांनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेदेखील तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचा खुलासा केला आहे. इरफानप्रमाणेच सोनालीनेसुद्धा एक इमोशनल मेसेज लिहून सध्या न्यूयॉर्क येथे आजारावर उपचार घेत असल्याचे सांगितले. 

 

साेशल मीडियावर आल्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...
सोनालीने आज दुपारी ही पोस्ट शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटीज तिला या आजारावर मात करण्यासाठी तिची हिंमत वाढवताना दिसत आहेत. 
- या सेलेब्समध्ये विवेक ओबरॉय, दिव्या दत्ता, इलियाना डिक्रूज, मनीष मल्होत्रा, करण जोहर, रितेश देशुमख  या सेलिब्रिटींच्या नावांचा उल्लेख आहे.


सोडला रिअॅलिटी शो: 

30 जून रोजी सोनालीने इंडियाज बेस्ट ड्रामेबाज सीजन 3 च्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. यामध्ये विवेक ओबरॉय आणि ओमंग कुमार यांच्यासोबत ती दिसतेय. सोनालीने कॅन्सरचे निदान झाल्यानंतर हा शो सोडला असून आता तिच्या जागी हुमा कुरैशी जज म्हणून शोमध्ये दिसणार आहे. Bad News: अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर, स्वतः ट्वीट करून दिली माहिती, न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु


पुढील स्लाईड्सवर वाचा, सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया... 

बातम्या आणखी आहेत...