आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरविषयी मुलाला कसे सांगावे या पेचात पडली होती सोनाली, लिहिली इमोशनल पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा रणवीरसोबतचा हा फोटो सोनालीने शेअर केला आहे. - Divya Marathi
मुलगा रणवीरसोबतचा हा फोटो सोनालीने शेअर केला आहे.

हाय ग्रेड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. सोनालीने स्वत: सोशल मीडियावर या आजाराची माहिती दिली होती. पण ही बातमी स्वत:च्या 12 वर्षांच्या मुलाला सांगणे सोनाली आणि तिचा पती गोल्डी बेहल या दोघांसाठीही सर्वात कठीण काम होते. आईच्या आजाराची बातमी ऐकून तो कसा रिअ‍ॅक्ट होईल, ही भीती होती. पण सोनाली व गोल्डी दोघांनीही ही स्थिती धीराने आणि संयमाने हाताळली. खुद्द सोनालीने ट्विटरवर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.

 

सोनालीने लिहिलेली पोस्ट...

सोनालीने तिचा मुलगा रणवीरसोबतचा एक फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट लिहिली. "माझ्या 12 वर्षे 11 महिने आणि 8 दिवसांच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेही गरजेचे होते. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजसपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला. आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो", असे सोनालीने लिहिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...