आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहेंगा परिधान करुन कानच्या रेड कार्पेटवर अवतरली सोनम कपूर, हातावर दिसली मेंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान : लग्नाच्या 6 दिवसांनंतर म्हणजेच 14 मे रोजी सोनम कपूर कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली. विशेष म्हणजेच Fashionista च्या रुपात प्रसिध्द असलेल्या सोनमने कानसाठी डिझायनर राल्फ आणि रस्सोचा ऑफ व्हाइट लहेंगा निवडला होता. एक्सेसरीजविषयी बोलायचे झाले तर तिने यासोबतच स्टड्स घातले होते, हे तिच्या वेडिंग रिंगसोबत मॅच करत होते. सोनम कानमध्ये कॉस्मेटिक ब्रँड लॉरिअल पेरिसकडून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली आहे.


8 मे रोजी झाले सोनमचे लग्न...
सोनम कपूरने 8 मे रोजी दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईत झाले होते. कानच्या रेड कार्पेटवर चालताना सोनमच्या हातात मेंदी स्पष्ट दिसत होती. सोनम रविवारी रात्री आपले सासर नवी दिल्लीतून कानसाठी रवना झाली होती. ती 2011 पासून सतत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अटेंड करतेय. 
- दोन आगामी चित्रपटांमध्ये सोनम कपूर भेटीला येणार आहे. 1 जूनला तिचा 'विरे दी वेडिंग' आणि 29 जूनला 'संजू' हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरचे कान फिल्म फेस्टिव्हल मधील रेड कार्पेटवरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...