आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची सोनम कपूर, वडील अनिल यांनी शेअर केला अनसीन PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूरने 9 जूनला आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने वडील अनिल कपूरने मुलीचा एक टीनऐज फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आजच्या लूकपेक्षा खुप वेगळी दिसत आहे. फोटोमध्ये दिसतेय की, टीनऐजच्या काळात तिचा रंग सावळा होता. आता ती गोरी झाली आहे. अनिलसोबतच पती आनंद आहूजा आणि काकू महीप संधूनेही सोनमचा अनसीन फोटो शेअर करत तिला बर्थडे विश केले आहे.


असिस्टेंट डायरेक्टर म्हणून केली होती करिअरची सुरुवात
- सोनम कपूरने आपल्या करिअरची सुरुवात डायरेक्टर संजय लीला भन्साळीसोबत 'ब्लॅक' या चित्रपटातून केली होती.
- सोनम या चित्रपटाची असिस्टेंट डायरेक्टर होती. याच चित्रपटाच्या काळात सोनमने अभिनयाची आवड दाखवली.
- डायरेक्टर भन्साळी यांनी सांगितले की, ते तिला पुढच्या 'सांवरिया' चित्रपटात घेणार आहेत.
- भन्साळी यांनी सोनम समोर अट ठेवली की, तिला यासाठी वजन कमी करावे लागेल.
- त्यावेळी सोनमचे वजन 80 किलो होते. भन्साळी यांची अट मान्य करत सोनमने 35 किलो वजन कमी केले.
- वजन कमी करण्यासाठी सोनमने शेरवीर आणि मोनीषाकडून वेट लॉस ट्रेनिंग घेतली. फिटनेस ट्रेनर जरीन वॉटसनकडून सेशन घेतले.
- यासोबतच तिने योग आणि कथकच्या मदतीने फिगर टोन केली. यामध्ये भरत ठाकुरने तिची मदत केली. दिवसभर अनेक प्रकारच्या एक्सरसाइज करुन सोनमने वजन कमी केले.


सुपरफ्लॉप ठरला डेब्यू चित्रपट 
- सोनमने रणबीर कपूरसोबत 'सांवरिया' चित्रपटातून डेब्यू केला. रणबीरचासुध्दा हा डेब्यू चित्रपट होता. परंतू हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
- सोनम निराश होण्याऐवजी मेहनत करत राहिली. यानंतर सोनम 'दिल्ली 6', 'आई हेट लव स्टोरिज', 'आयशा', 'मौसम', 'प्लेयर्स', 'रांझणा', 'भाग मिल्खा भाग', 'खूबसूरत', 'डॉली की डोली', 'प्रेम रतन धन पायो', 'नीरजा', 'पैडमैन', 'वीरे दी वेडिंग' मध्ये दिसली. 
- 'संजू' आणि 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. हे दोन्हीही चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरचे अनसीन PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...