आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानमध्ये दूस-या दिवशी रेड अँड व्हाइट ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान : लग्नाच्या 7 दिवसांनंतर म्हणजे 15 मे रोजी सोनम कपूर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये डिफरेंट लूकमध्ये दिसली. हा सोनमचा कानमधील सेकंड लूक आहे. यावेळी सोनम रेड अँड व्हाइट स्ट्रिप्ड ड्रेसमध्ये दिसली. तिच्या ड्रेसवर बेल्ट लावलेला होता. जो खुप सुंदर दिसत होता. सोनमने केस बांधलेले होते. तर सोनमचा अजून एक लूक यावेळी पाहायला मिळाला. यामध्ये सोनम फ्लोरल प्रिंटच्या मिंट ग्रीन ड्रेसमध्ये दिसली. 14 रोजी रेड कार्पेटवर सोनमने ऑफ व्हाइट लहेंगा घातला...


यापुर्वी सोनम 14 मे रोजी रेड कार्पेटवर दिसली होती. विशेष म्हणजे  Fashionista च्या रुपात प्रसिध्द असलेल्या सोनमने कानसाठी डिझायनर राल्फ आणि रुसोचा ऑफ व्हाइट लहेंगा घातला. एक्सेसरीजमध्ये तिने स्टड्स घातले होते. जे तिच्या वेडिंग रिंगशी मॅच करत होते. सोनम कानमध्ये कॉस्मॅटिक ब्रँड लॉरिअल पेरिसकडून भारताचे प्रतिनिधित्त्व करतेय. 


8 मे रोजी झाले सोनमचे लग्न...
सोनम कपूरने 8 मे रोजी दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईत झाले होते. कानच्या रेड कार्पेटवर चालताना सोनमच्या हातात मेंदी स्पष्ट दिसत होती. सोनम रविवारी रात्री आपले सासर नवी दिल्लीतून कानसाठी रवाना झाली होती. ती 2011 पासून सतत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अटेंड करतेय. 


- दोन आगामी चित्रपटांमध्ये सोनम कपूर भेटीला येणार आहे. 1 जूनला तिचा 'विरे दी वेडिंग' आणि 29 जूनला 'संजू' हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...