आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor Or Aanad Ahuja Shadi Bidaai And Makeup And Sangeet Ceremony Inside Photos Shared By Vogue India

Inside Photos:सोनमच्या पाठवणीचा पहिला इमोशनल फोटो आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 8 मे रोजी सोनम कपूरने दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले होते. वोग मॅगझिनने सोनमचे लग्न कव्हर केले होते. आता जवळपास 2 महिन्यांनंतर मॅगझिनने तिच्या लग्नाचे काही इनसाइड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये सोनम पुर्ण कुटूंबासोबत दिसतेय. फोटोमध्ये दिसतेय की, तिची लहान बहिण रिया तिच्या मेकअप आर्टिस्ट्ससोबत मिळून सोनमचा मेकअप करतेय. तर आई सुनीता या लेकीला मेंदी लावत आहेत. संगीतमध्ये भाऊ हर्षवर्धन बहिणीसोबत पोज देताना दिसतोय तर अनिल कपूर स्वतः आपल्या मुलीला लग्नाच्यावेळी स्टेजवर घेऊन आले. यासोबतच पाठवणीच्या वेळी इमोशनल झालेल्या सोनमचा पहिला फोटोही वोगने शेअर केला आहे. मॅगझिनने सोनम-आनंदच्या लग्नाला यावर्षीचे मोस्ट स्टायलिस्ट वेडिंग ऑफ द ईयर असे म्हटले आहे. 


वोग मॅगझिनसोबत सोनमने शेअर केली बॉयफ्रेंडसोबतची पहिली भेट
- सोनमने वोग मॅगझिनसाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "पहिल्यांदा जेव्हा मी आनंदला भेटायला गेले तेव्हा मी निकृष्ठ शूज घातले होते. असे शूज त्याने कदाचित कधी पाहिलेही नसतील. तरीही मी त्याला म्हणत राहिले की, माझे निकृष्ठ शूज पाहिल्यानंतरही तु माझ्या प्रेमात पडशील."
- आनंदला शूज कलेक्ट करण्याचा शौक आहे. तो भारताच्या पहिल्या शू स्टोर 'वेज-नॉन वेज' चे मालक आहेत. हे माहिती असूनही सोनम, आनंदला भेटायला गेल्यावर निकृष्ठ शूज घालून गेली होती. 
- सोनमच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, सोनम कपूर वडील अनिल कपूरसोबत 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट 2018 ला रिलीज होईल. गेल्या महिन्यात तिचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट हिट ठरला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरच्या लग्नाचे INSIDE PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)