आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षांची सोनम म्हणाली - 'मला नाही वाटत की, आपल्या वयाची लाज वाटावी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सोनम कपूर आहूजा शनिवारी आपला 33 वा वाढदिवस साजरा करतेय. ती सध्या पती आनंद आहूजा, भाऊ अर्जुन कपूर, बहिण रिया कपूर आणि करीना कपूर खानसोबत काही जवळच्या मित्रांसोबत लंडनमध्ये आहे. त्यांच्यासोबत झालेली बातचित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
प्रश्न - आज तु 33 वर्षांची झाली आहेस
उत्तर - हो, ही चांगली गोष्ट आहे ना? खरं तर वय हा फक्त एक नंबर आहे. मला नाही वाटत की, कुणाला आपल्या वयाची लाज वाटावी. मी आयुष्य जगतेय यात मी आनंदी आहे.
 
प्रश्न - गेल्या काही वर्षांपासून स्वतःमध्ये काय बदल पाहतेय?
उत्तर - मी जराही बदलले नाही असे मला वाटते. फक्त थोडी परिपक्व झाले आहे. सलमान खान तर मला आजही बच्चा समजतात.
 
प्रश्न - वाढदिवसाचा एखादा किस्सा शेअर कराल?
उत्तर - माझ्या प्रत्येक बर्थडेला मी अपेक्षा करत असते की, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी खुप गिफ्ट आणावेत. यासंबंधीत अनेक आठवणी आहेत. मी आनंदला डेट करणे सुरु केले होते. मला तेव्हा त्याला भेटून फक्त दोन महिने झाले होते. त्यानी माझ्यासाठी सरप्राइज प्लान केला होता. तो मुंबईत आला आणि एक रेस्तरॉ बुक केला. आम्ही डेट करतोय हे तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हते. तो हे सर्व प्लान करेल याची कल्पना मला नव्हती. त्याने माझ्या हिशोबाने मेन्यू आणि म्यूझिक प्लान केला होता. मला हँडरिटन कार्डही दिले होते. हे खुप स्वीट होते. यापुर्वी कुणीही माझ्यासाठी एवढा स्पेशल प्लान केला नव्हता.
 
प्रश्न - वाढदिवसाचे आतापर्यंतचे सर्वात स्पेशल बर्थडे गिफ्ट कोणते होते?
उत्तर - स्वरा भास्करने मला लहान मुलांचे रजाई दिली होती. त्यावेक अनेक पुस्तकांचे पोस्टर होते. खालिद मोहम्मद(चित्रपट दिग्दर्शक) अंकलला माहिती आहे की, मला आर्ट आवडते. ते मला नेहमीच लहान-लहान वस्तू गिफ्ट करत असतात. ते नेहमी माझी काळजी घेतात.
 
प्रश्न - पुढच्या वाढदिवसापुर्वी तुला काय जाणून घ्यायची इच्छा आहे?
माझे वैवाहिक आयुष्य कसे असेल? कारण माझ्या लग्नाला आता फक्त एक महिना झाला आहे. लोक याविषयी अनेक प्रश्न विचारत आहेत.
 
 
 

बातम्या आणखी आहेत...