आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरचे वेडिंग कार्ड : दिवसा होणार लग्न, रात्री होणार म्युझिक-डान्स पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनमवारी कपूर आणि आहूजा कुटूंबाने सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला. आता या लग्नाची पत्रिकाही समोर आली आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नाच्या विधी 7 आणि 9 मेला होणार आहेत. वेडिंग सेरेमनी 8 मेला सकाळी 11 ते दुपारी 12.30 या काळात होणार आहे. या विधी रॉकडेल, 256, बँडस्टँड बांद्रामध्ये होतील. सेरेमनीनंतर पाहूण्यांसाठी लंच असेल. यावेळी कपूर आणि आहूजा कुटूंबीय व्हाइट ट्रेडिशनल ड्रेसमध्ये असतील.


लग्नाच्या एकदिवसआधी मेहेंदी सेरेमनी
लग्नाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 7 मेला सोनम आणि आनंदची मेहेंदी सेरेमनी होणार आहे. सेरेमनी संध्याकाळी 4 वाजता बीकेसी येथील सनटेकम सिग्नेचर आयलँडमध्ये होईल. कपूर आणि आहूजा कुटूंबियांसाठी व्हाइट ट्रेडिशनल ड्रेसकोड ठेवण्यात आलाय.

 

आणि 8 मेला रात्री 8 वाजता होणार वेडिंग पार्टी
- लग्नानंतर 8 मेला कपूर आणि आहूजा कुटूंबियांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी पार्टी होस्ट केली आहे. पार्टीमध्ये डान्स आणि म्यूझिकसोबतच सेलिब्रिटीज थिरकताना दिसू शकतात. ही पार्टी द लीला हॉटेमध्ये होईल. या पार्टीसाठी दोन्ही कुटूंबियांनी इंडियन किंवा वेस्टर्न आउटफिट ड्रेसकोड ठेवला आहे. पार्टीच्या दिवशी कार्डमध्ये लिहिले की, तुमची उपस्थितीच आमच्यासाठी खास गिफ्ट असेल.

बातम्या आणखी आहेत...